Oscars 2021 : ८९ वर्षांच्या आजीबाई अन ऑस्कर...Ann roth यांनी केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 08:37 AM2021-04-26T08:37:05+5:302021-04-26T08:37:29+5:30

वयाच्या ८९व्या वर्षी चक्क उतारवयात एन रोथ यांनी इतिहास रचला आहे.

Oscars 2021: 89 year old grandmother Ann Roth wins Oscar ...Ann Roth is now the oldest woman to win a competitive Oscar | Oscars 2021 : ८९ वर्षांच्या आजीबाई अन ऑस्कर...Ann roth यांनी केली कमाल

Oscars 2021 : ८९ वर्षांच्या आजीबाई अन ऑस्कर...Ann roth यांनी केली कमाल

googlenewsNext

९३ व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) लॉस अँजेलिसमध्ये सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत बऱ्याच श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी हा अवॉर्ड सोहळा स्पेशल आणि ऐतिहासिक आहे. कारणही तसे खास आहे या सोहळ्यात कोणी होस्ट नाही, प्रेक्षक नाहीत आणि नॉमिनीजदेखील नाहीत. वयाच्या ८९व्या वर्षी चक्क उतारवयात एन रोथ यांनी इतिहास रचला आहे. त्या उतारवयात ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्या महिल्या ठरल्या आहेत. 

मा रैनीच्या ब्लॅक बॉटमला दोन पुरस्कार मिळाले आहेत. मा रैनीचा ब्लॅक बॉटमला बेस्ट कॉश्च्युम डिझाइनचा एन रोथ यांना पुरस्कार मिळाला आहे. एन रोथ यांनी हा पुरस्कार प्राप्त करत इतिहास बनवला आहे. त्यांना वयाच्या ८९व्या वर्षी ऑस्कर मिळाला आहे. इतक्या जास्त वयात ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

याशिवाय ब्लॅक बॉटमने बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंगचाही पुरस्कार पटकावला आहे. मिया नील आणि जमिका विल्सन पहिल्या काळ्या महिला आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


 

Web Title: Oscars 2021: 89 year old grandmother Ann Roth wins Oscar ...Ann Roth is now the oldest woman to win a competitive Oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर