ठळक मुद्देगतवर्षीही आॅस्कर 2019 मध्ये बिली पोर्टर अशाच अतरंगी स्टाईलमध्ये दिसला होता.

92 व्या ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर हॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. एकापेक्षा एक ग्लॅमरस,स्टाईलिश अंदाजात हॉलिवूड स्टार्सनी रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. पण सर्वाधिक लक्ष वेधले ते अभिनेता बिली पोर्टरने. होय, अभिनेता, गायक बिली पोर्टरचा अनोखा लूक पाहून अनेकजण  थक्क झालेत.

बटरफ्लाय डिझाईनचा बॉलगाऊन, त्यावर हिल्सच्या सँडल, डोळ्यावर गॉगल अशा अतरंगी अवतारात तो ऑस्करच्या रेड कार्पेटवर अवतरला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. त्याच्या स्टाइलिस्टने सांगितल्यानुसार, बिलीचा हा लूक रॉयल्स प्रेरित होता.

बिली या लूकमध्ये अतिशय कॉन्फिडन्स दिसला. बिली हा गे आहे. त्याने स्वत:च याची कबुली दिली होती. 14 जानेवारी 2017 रोजी त्याने त्याचा पार्टनर एडम स्मिथसोबत लग्न केले.

बिलीचा हा लूक पाहून भारतीय चाहत्यांना निश्चितपणे रणवीर सिंग आठवणार नसेल तर नवल...

गतवर्षीही आॅस्कर 2019 मध्ये बिली पोर्टर अशाच अतरंगी स्टाईलमध्ये दिसला होता. गतवर्षी त्याने त्याने व्हाईट रफल्स स्लीव्स, ब्लॅक बो टायसोबत बॉल स्कर्ट घातला होता. त्याचा हा लूक सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. लोकांनी त्याला रणवीर सिंगचा भाऊ म्हणत भन्नाट मीम्स शेअर केले होते. काहींनी त्याला हॉलिवूडचा रणवीर सिंग म्हटले होते.  

Web Title: oscars 2020 billy porter the ranveer singh of hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.