Oscars 2019: Roma, The Favourite, Black Panther Lead the Academy Award Nominees | Oscars 2019 : ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ला सर्वाधिक नामांकने; कोण मारणार बाजी?

Oscars 2019 : ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ला सर्वाधिक नामांकने; कोण मारणार बाजी?

ठळक मुद्देसर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात ‘ब्लॅक पँथर’, ‘ब्लॅक क्लान्झमन’,  ‘दी बोहेमियन राप्सोडी’, ‘द फेव्हरिट’, ‘ग्रीन बुक’, ‘रोमा’, ‘अ स्टार इज बॉर्न’, ‘व्हाइस’ या चित्रपटांचा समावेश आहे. 

सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ऑस्करअवार्ड येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. या नामांकनात ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत. ऑस्करसाठी नामांकन हाही मोठा सन्मान आहे. पण तरिही ऑस्करची बाहुली कुणाच्या हातात जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात ‘ब्लॅक पँथर’, ‘ब्लॅक क्लान्झमन’,  ‘दी बोहेमियन राप्सोडी’, ‘द फेव्हरिट’, ‘ग्रीन बुक’, ‘रोमा’, ‘अ स्टार इज बॉर्न’, ‘व्हाइस’ या चित्रपटांचा समावेश आहे. 
यापैकी अल्फान्सो क्वारोन  दिग्दर्शित ‘रोमा’ या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणीत दहा नामांकने मिळाली आहेत.  सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटांशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट सिनेमेटोग्राफी आदी श्रेणीत त्याला नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीसाठी  ‘रोमा’ची अभिनेत्री मारिना डी टॅव्हिरा हिला अनपेक्षित नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात कथा मेक्सिकोतील आहे.
 ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनेत्री (लेडी गागा), उत्कृष्ट अभिनेता (ब्रॅडले कूपर) यासाठी नामांकने आहेत. सहअभिनेत्रीसाठी अ‍ॅमी अ‍ॅडम्स (व्हॉइस) एमा स्टोन ( द फेव्हरिट) यांना नामांकने असून उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘दी वाइफ’ मधील ग्लेन क्लोज हिला नामांकन मिळाले आहे. ख्रिस्तियन बेल, महेर्शला अली, सॅम रॉकवेल, रेचल वेझ यांचाही नामांकनात समावेश आहे.

पाहा, नामांकनांची यादी


सर्वोत्कृष्ट चित्रपट

ब्लॅक पँथर 
 ब्लॅक क्लान्झमन
  दी बोहेमियन  राप्सोडी
 द फेव्हरिट
 ग्रीन बुक
 रोमा
अ स्टार इज बॉर्न
व्हाइस

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

यालित्झा अपॅरिशियो -रोमा
ग्लेन क्लोज - द वाइफ
आॅलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट
लेडी गागा - अ स्टार इज बॉर्न
मेलिसा मॅकार्थी - कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

स्पाइक ली- ब्लॅकक्लान्झमन
पावेल पावलीकोवस्की- कोल्ड वॉर
योरगॉस लँथीमोस- द फेव्हरिट
अल्फान्सो क्वारोन - रोमा
अ‍ॅडम मॅक्के- व्हाइस

सर्वोत्कृष्ट  अभिनेता

ख्रिस्तियन बेल- व्हाइस
ब्रॅडले कुपर - अ स्टार इज बॉर्न
विल्यम डॅफो- अ‍ॅट इटर्निटीज स्टेट
रामी मॅलेक- बोहेमियन राप्सोडी
व्हिगो मॉर्टेन्सन- ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट  परभाषिक चित्रपट

कॅपरनम
 कोल्ड वॉर
 नेव्हर  लुक अवे
 रोमा
म्शॉपलिफ्टर्स

सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री

अ‍ॅमी अ‍ॅडम्स- व्हाइस
 मरिना डी ताविरा- रोमा 
रेगिना किंग- इफ बियल स्ट्रीट क्लाउड टॉक  एमा स्टोन- द फेवरिट 
रेचल वेझ- द फेव्हरिट

सर्वोत्कृष्ट सहअभिनेता

महेर्शला अली- ग्रीन बुक   
 अ‍ॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन
  सॅम इलिय- अ स्टार इन बॉर्न
रिखर्ड ई ग्रांट - कॅन यू एव्हर फरगिव्ह मी
सॅम रॉकवेल- व्हाइस

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oscars 2019: Roma, The Favourite, Black Panther Lead the Academy Award Nominees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.