Oscars 2019: Academy drops four categories. Fans are furious | ऑस्कर सोहळा वादात! चार श्रेणीतील पुरस्कारांचे होणार ‘ऑफ एअर’ वितरण!!
ऑस्कर सोहळा वादात! चार श्रेणीतील पुरस्कारांचे होणार ‘ऑफ एअर’ वितरण!!

ठळक मुद्देयेत्या २४ फेब्रुवारीला (भारतीय प्रमाणवेळेनुसार २५ फेब्रुवारी) लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर सोहळा रंगणार आहे.

ऑस्कर 2019 ची रात्र जवळ येत असतानाच, हा पुरस्कार सोहळा वादात सापडला आहे. होय, ताजी चर्चा मानाल तर, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑस्कर सोहळ्यासाठी कुणीही होस्ट नसेल. खरे तर कॉमेडियन केविन हार्ट हा  यंदाचा ऑस्कर सोहळा होस्ट करणार होता. पण करारबद्ध केल्यानंतर दोनचं दिवसांत त्याच्याकडून हे काम काढून घेण्यात आले. त्याच्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे हा निर्णय घेण्यात आला.  त्याचे हे ट्वीट बरेच जुने होते. पण ऑस्कर सोहळ्याच्या ऐन तोंडावर हे ट्वीट नव्याने व्हायरल झाले होते.
याशिवाय आणखी एका कारणाने यंदाचा ऑस्कर सोहळा वादात सापडला आहे.   दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला आहे. होय, सिनेमेटोग्राफी, फिल्म एडिटींग,लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट, मेकअप आणि हेअरस्टाईलिंग या चार श्रेणीतील पुरस्कार यंदाच्या ऑस्कर सोहळ्यातून गाळण्यात आले आहे. हे चारही पुरस्कार यंदा ऑफ एअर  म्हणजेच कमर्शिअल ब्रेकदरम्यान दिले जातील. सोहळ्याचा कालावधी ३ तासांपर्यंत मर्यादीत ठेवण्यासाठी ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात सर्वत्र रोष दिसून येत आहे. टिष्ट्वटरवर या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


येत्या २४  फेब्रुवारीला (भारतीय प्रमाणवेळेनुसार २५  फेब्रुवारी ) लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर सोहळा रंगणार आहे. यंदाच्या ऑस्कर नामांकनात दोन चित्रपटांचा बोलबाला आहे. ‘रोमा’ आणि ‘द फेवराईट’ या दोन्ही चित्रपटांना १०-१० नामांकने मिळाली आहेत. याशिवाय ब्रॅडली कूपर आणि लेडी गागा यांच्या ‘अ स्टार इज बॉर्न’ ला ८ श्रेणीत नामांकने मिळाली आहे.


Web Title: Oscars 2019: Academy drops four categories. Fans are furious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.