oscar awards 2020 academy awards live updates | Oscar 2020 LIVE : पॅरासाईटची अद्भुत कामगिरी; दोन विभागांत सर्वोत्कृष्ट ठरलेला पहिलाच चित्रपट
Oscar 2020 LIVE : पॅरासाईटची अद्भुत कामगिरी; दोन विभागांत सर्वोत्कृष्ट ठरलेला पहिलाच चित्रपट

Oscar Awards 2020 LIVE : जगातल्या प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष आहे. अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. हॉलिवुड सुपरस्टार ब्रॅड पिटला पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी पिटचा गौरव करण्यात आला आहे. बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर विभागात तो पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. या विभागात पिटसोबत टॉम हँक्स, एँथॉनी हॉपकिन्स, जॉय पेस्की आणि एल. पचिनो यांनादेखील नामांकन मिळालं होतं. मात्र पिटनं बाजी मारली. 

LIVE

Get Latest Updates

10:11 AM

पॅरासाईटची ऐतिहासिक कामगिरी; ऑस्कर जिंकणारा परदेशी भाषेतला पहिला चित्रपट

09:55 AM

रुनी झेलवेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; जुडी चित्रपटातल्या अभिनयासाठी ऑस्कर

09:43 AM

जोक्विन फिनिक्सला जोकर चित्रपटात साकारलेल्या मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर

09:34 AM

पॅरासाईट चित्रपटाचा ऑस्कर सोहळ्यात बोलबाला; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर

09:32 AM

''(आय अ‍ॅम गॉना) लव्ह मी अगेन'' ओरिजनल साँग विभागात सर्वोत्तम

09:30 AM

ओरिजनल स्कोअर विभागात 'जोकर'चा सन्मान

09:12 AM

पॅरासाईट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

08:53 AM

मेकअप आणि हेयर स्टाईलिंग विभागात बॉम्बशेल सर्वोत्तम

08:52 AM

सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी '1917'चा सन्मान

08:51 AM

फिल्म एडिटिंग विभागात 'फोर्ड व्हर्सेस फेरारी' सर्वोत्तम

08:49 AM

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी '1917' चित्रपटाचा गौरव

08:48 AM

साऊंड मिक्सिंग विभागात '1917' ठरला सर्वोत्कृष्ट

08:45 AM

साऊंड एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार 'फोर्ड व्हर्सेस फेरारी'ला

08:37 AM

लॉरा डर्नला मॅरेज स्टोरीसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

08:33 AM

अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्तम फिचर डॉक्युमेंटरी

08:31 AM

सर्वोत्तम कॉस्चुम डिझाईनसाठी 'लिटिल वुमन'चा सन्मान

08:30 AM

सर्वोत्तम प्रॉडक्शन डिझाईन विभागात वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड ठरला सर्वोत्कृष्ट

08:27 AM

सर्वोत्तम लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार 'द नेबर्स विंडो'ला

07:44 AM

जोजो रॅबिटला सर्वोत्तम अ‍ॅडप्टेड स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर

07:40 AM

'पॅरासाईट'ला ओरिजनल स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर

07:33 AM

ब्रॅट पिटला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तो खास क्षण

07:32 AM

हेअर लव्ह सर्वोत्तम अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

07:31 AM

टॉय स्टोरी ४ सर्वोत्तम अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म

07:28 AM

सर्वोत्तम सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी ब्रॅड पिटचा सन्मान

Read in English

English summary :
92nd Oscar Awards 2020 Live : The world's most prestigious Oscar Awards ceremony has begun. The ceremony is taking place at the Dolby Theater in Los Angeles, USA. For full list of Oscar winners visit Lokmat.com. Stay updated.

Web Title: oscar awards 2020 academy awards live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.