Oscars 2021: चुलू जौ हिने इतिहास रचला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर जिंकणारी पहिली आशियाई महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 07:38 AM2021-04-26T07:38:50+5:302021-04-26T07:40:01+5:30

आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील प्रतिष्ठेच्या 93 व्या ऑस्कर सोहळ्याला थाटात सुरुवात झाली. कोरोनामुळे यंदा ऑस्कर सोहळ्यातील अनेक गोष्टी बदललेल्या दिसल्या. पण सोहळ्याचा बाज कायम दिसला.

Oscar 2021 - hollywood chloe zhao wins best director award see the list of oscar winners | Oscars 2021: चुलू जौ हिने इतिहास रचला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर जिंकणारी पहिली आशियाई महिला

Oscars 2021: चुलू जौ हिने इतिहास रचला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर जिंकणारी पहिली आशियाई महिला

googlenewsNext

आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील प्रतिष्ठेच्या 93 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscar 2021) थाटात सुरुवात झाली. कोरोनामुळे यंदा ऑस्कर सोहळ्यातील अनेक गोष्टी बदललेल्या दिसल्या. पण सोहळ्याचा बाज कायम दिसला. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत, 93 वा ऑस्कर सोहळा रंगला. या सोहळ्यात ‘नोमाडलँड’ या सिनेमासाठी चुलू जौ हिने सर्वोत्कृष्ट दिग्दशर्काचा ऑस्कर पटकावला. 

हा पुरस्कार पटकावत, Chloe Zhao ने इतिहास रचला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पटकावणारी ती पहिली आशियाई महिला ठरली. ज्याला स्वत:वर विश्वास आहे़ स्वत:तील चांगुलपणा आणि इतरांमधील चांगुलपणा कायम ठेवण्याचा ध्यास आहे, त्या सर्वांना माझा पुरस्कार समर्पित आहे,  असे ती आपल्या भाषणात यावेळी म्हणाली. (Oscar Awards)

पाहा संपूर्ण ऑस्कर विजेत्यांची यादी
बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर - डेनिअल कलूया (जुडास एंड द ब्लैक मसीहा)
बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म - अनदर राऊंड
बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म - सोल
बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू
बेस्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - टू डिस्टंट स्ट्रेन्जर्स
बेस्ट साऊंड - निकोलस बेकर, फिलिप ब्लैड, कार्लोस कोर्टेस, मिशेल कॉटनटॉलन,  (साऊंड आॅफ मेटल)
 
 

Web Title: Oscar 2021 - hollywood chloe zhao wins best director award see the list of oscar winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर