'फोटोग्राफ'चा गायक एड शीरन जवळ एकही फोन नाही. त्याच्याशी लोक ईमेल मार्फत संपर्क साधतात. शीरनने २०१५ मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाईस व सोशल नेटवर्किंग साईडचा त्याग केला होता. त्याने जग भ्रमंती करण्यासाठी जवळपास १ वर्षांचा ब्रेक घेतला होता.

फिमेल फर्स्ट डॉट को डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटेनच्या ’ब्रिटेन्स आईएम अ सेलिब्रिटी..गेट मी आउट ऑफ हेयर’ या शोच्या एका एपिसोडमध्ये एड शीरनचा मित्र रोमन केंपने सांगितलं की, एडजवळ फोन नाही, तुम्ही त्याला मेल करू शकता. 


२०१७ साली एडने सर्व डिवाईसचा त्याग करण्यामागचा खुलासा करत सांगितलं होतं की, असं केल्यामुळे त्याला त्याच्यावरील तणाव कमी व्हायला मदत मिळते.


पुढे म्हणाला की, मी एक आयपॅड विकत घेतलं आहे. ज्यात मी फक्त ईमेल पाहतो आणि त्यामुळे माझ्यावरील ताण खूप कमी राहतो. मी सकाळी सकाळी उठत नाही आणि मला ५० मेसेजना उत्तर देण्याची देखील गरज भासत नाही. अशात मी फक्त झोपेतून उठत आरामात चहाचा आनंद घेतो.

Web Title: OMG ...! singer Ed Sheeran does not have any mobile, people do this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.