हॉलीवूड चित्रपट घोस्ट रायडरचा अभिनेता निकोलस केजला प्रचंड फॅन  फॉलोव्हिंग असून त्याला जगभरातील त्याचे फॅन्स सोशल सोशल मीडियावर फोलो करतात. निकोलस त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याने नुकतेच लग्न केले असून त्याच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

निकोलसचे हे पाचवे लग्न असून त्याने त्याच्यापेक्षा तब्बल 31 वर्षं लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केले आहे.  57 वर्षीय निकोलस केजने आपल्या 26 वर्षीय जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत लाल वेगास येथील एका हॉटेलमध्ये लग्न केलं. निकोलसने अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थित लग्न केले. या लग्नाबाबत मीडियाला कळल्यानंतर पीपल मासिकाच्या प्रतिनिधीशी बोलताना निकने सांगितले की, हो हे खरे आहे आणि आम्ही दोघेही आमच्या या नव्या नात्यामुळे प्रचंड खूश आहोत. 

निकोलस केज आणि रीको शिबाटा यांनी 16 फेब्रुवारीला लग्न केले होते. पण या लग्नाबाबत खूपच उशिरा मीडियाला कळले. निकोलसने 16 फेब्रुवारीला लग्न करण्यामागे खास कारण होते. त्याच्या वडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी याच तारखेला झाले होते. त्यामुळे त्याने वडिलांच्या स्मरणार्थ या तारखेची निवड केली. 

पीपल मासिकाने निकोलस आणि रीकोच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर छोटंसं सेलिब्रेशन देखील ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे निकोलसची एक्स पत्नीदेखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nicolas Cage confirms marriage to girlfriend Riko Shibata in Las Vegas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.