ठळक मुद्देअनास्तासिया पोक्रेशचुक ही युक्रेमधील मॉडेल केवळ 32 वर्षांची आहे. तिने गेल्या सहा वर्षांत अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रियांनंतर आता तिचे गाल हे सगळ्यांपेक्षा मोठे असल्याचा दावा तिने केला आहे.

आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण चेहऱ्याला कोणते ना कोणते मलम लावत असतो. तसेच अनेक मुली मेकअप करताना दिसतात. अभिनेत्री तर आपण चांगले दिसावे यासाठी प्रचंड पैसा खर्च करून शस्त्रक्रिया करतात. काही शस्त्रक्रिया यशस्वी ठरतात तर काही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याने रूपाचे बेरूप होते. 

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत ओठावर, चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. काही या शस्त्रक्रियांमुळे अधिक सुंदर दिसायला लागल्या आहेत तर काहींच्या शस्त्रक्रिया बिनसल्यामुळे त्यांना बॉलिवूड सोडावे लागले आहे. युक्रेनमधील एका मॉडेलने तिच्या चेहऱ्यावर आणि ओठावर शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. पण या शस्त्रक्रियांनंतर तिचा चेहरा इतका बिघडला की, तिला ओळखणे देखील शक्य होत नाहीये.

अनास्तासिया पोक्रेशचुक ही युक्रेमधील मॉडेल केवळ 32 वर्षांची आहे. तिने गेल्या सहा वर्षांत अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रियांनंतर आता तिचे गाल हे सगळ्यांपेक्षा मोठे असल्याचा दावा तिने केला आहे. पण यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 

अनास्तासियाने या शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये घालवले आहेत. तिने काही दिवसांपूर्वी तिचा पूर्वीचा आणि आताचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण हा फोटो पाहून तू पहिली छान दिसायची... तू शस्त्रक्रियेनंतर तुझे रुपच बदलले आहे असे लोक तिला सांगत आहे. या शस्त्रक्रियेनंतर तू कुरूप झाली आहेस... तू पूर्वी अतिशय सुंदर दिसायची सांगत तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Model With 'World's Biggest Cheeks' Looks Unrecognisable In Pre-Surgery Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.