miss universe 2019 contestants fall on ramp while bikini walk due to wet floor-watch-here-full-video | Miss Universe 2019: अन् बिकिनी राऊंडमध्ये एकापाठोपाठ एक रॅम्पवर घसरून पडल्या स्पर्धक...!!
Miss Universe 2019: अन् बिकिनी राऊंडमध्ये एकापाठोपाठ एक रॅम्पवर घसरून पडल्या स्पर्धक...!!

ठळक मुद्देआयोजकांचे मानाल तर, रॅम्पवर त्याठिकाणी काहीसा ओलावा असल्याने ही घटना घडली.

काल रविवारी अमेरिकेच्या अटलांटा येथे ‘मिस युनिव्हर्स 2019’चा रंगारंग सोहळा पार पडला. या स्पर्धेत 93 देशांतील सौंदर्यवतींनी भाग घेतला. या सौंदर्यवतींना टक्कर देत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने ‘मिस युनिव्हर्स 2019’च्या किताबावर आपले नाव कोरले. पण या सोहळ्याच्या स्विमसूट राऊंडमध्ये असे काही झाले की, त्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही.
होय, स्विमसूट राऊंडदरम्यान मोठ्या तो-यात रॅम्पवर आलेल्या एका सौंदर्यवतीचा पाय घसरला आणि ती रॅम्पवरच खाली पडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मिस फ्रान्स माएवा कूच हिच्यासोबत ही घटना घडली. स्वत: माएवाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

स्विमसूट राऊंडमध्ये वॉक पूर्ण करत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. अर्थात खाली पडल्यानंतरही काही झालेच नाही, अशा आत्मविश्वासाने ती पुन्हा उभी झाली आणि परिक्षकांकडे हसत हसत माघारी परतली.  पडल्यानंतरचा व्हिडीओ शेअर करताना, ‘पडल्यानंतर पुन्हा नव्या दमाने उभे राहणे, हेच महिलांच्या जीवनाचे सार आहे,’ असे माएवाने लिहिले.
 

विशेष म्हणजे, रॅम्पवर घसरणारी ती एकटी नव्हती. जवळजवळ सर्वच जणी एकाच जागी घसरून पडल्या. त्यामुळे हे जाणीवपूर्व केले गेले असावे, असा कयास बांधला जात आहे. आयोजकांचे मानाल तर, रॅम्पवर त्याठिकाणी काहीसा ओलावा असल्याने ही घटना घडली.

Web Title: miss universe 2019 contestants fall on ramp while bikini walk due to wet floor-watch-here-full-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.