Lady Gaga is PREGNANT but it's not what you think | लेडी गागाने दिली कबुली...! Yeah,  I’m pregnant with #LG6!!
लेडी गागाने दिली कबुली...! Yeah,  I’m pregnant with #LG6!!

होय, लेडी गागा प्रेग्नंटआहे. पण जरा थांबा...तुम्ही जसे समजताय, तसे मात्र अजिबात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लेडी गागा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. आत्तापर्यंत या चर्चांवर लेडी गागाने मौन बाळगले होते. पण अखेर आज गागाने खुलासा केलाच. तोही सोशल मीडियावर.
मी प्रेग्नंट असल्याची अफवा आहे. Yeah,  I’m pregnant with #LG6, असे ट्विट लेडी गागाने केले. लेडी गागाच्या या ट्विटवर तूर्तास चाहते एकापेक्षा एक भन्नाट कमेंट करत आहेत.
 Well give birth nowwww ...असे एका युजरने लिहिलेय. तर दुस-याने  I’m ready mom #LG6, अशी मजेशीर प्रतिकिया दिली. लेडी गागाच्या प्रेग्नंसीची बातमी सर्वातआधी एका नियतकालिकात झळकली होती. लेडी गागा लवकरच ‘ए स्टार इज बॉर्न’मधील तिचा को-स्टार ब्रॅडली कूपरच्या मुलाची आई होणार आहे, असा दावा या बातमीत केला गेला होता. यानंतर लेडी गागाच्या प्रेग्नंसीची बातमी वा-याच्या वेगाने व्हायरल झाली होती.


अलीकडे ऑस्कर अवार्ड सोहळ्यात लेडी गागा व ब्रॅडली कूपरची शानदार केमिस्ट्री दिसली होती. दोघांनीही या सोहळ्यात एकत्र परफॉर्मन्स दिला होता. अत्यंत पॅशनेट व इंटिमेट अशा या केमिस्ट्रीनंतर लेडी गागा व ब्रॅडली कूपर यांने अनेक क्लोजअप फोटो ट्रेंड करू लागले होते. याचवर्षी अमेरिकन सिंगर - अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला ऑस्कर  पुरस्कार मिळाला. ‘अ स्टार इज बॉर्न’ या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा फिल्ममधील लेडी गागाने गायलेल्या Shallow या लोकप्रीय गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग श्रेणीत आॅस्कर पुरस्काराने गौरविले गेले.  ऑस्कर जिंकल्यानंतर लेडी गागा अक्षरश: रडत रडत भाषण केले होते. ‘हे माझ्या कष्टाचे फळ आहे. यासाठी मी प्रचंड मेहनत केली. तुमच्याकडे स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करा. तुम्हाला कितीदा नकार मिळतो, कितीदा तुम्ही पडता,ठेचाळता, हे महत्त्वाचे नसून तुम्ही कितीदा उठून उभे राहता, हे महत्त्वाचे आहे,’ असे लेडी गागा म्हणाली होती.


Web Title: Lady Gaga is PREGNANT but it's not what you think
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.