kylie Jenner trolled by fans on twitter over shower Pressure Recent Bathroom Pics | काइली जेनरने शेअर केला बाथरुम फोटो, होतेय जबरदस्त ट्रोल

काइली जेनरने शेअर केला बाथरुम फोटो, होतेय जबरदस्त ट्रोल

काइली जगातील सर्वात कमी वय असणारी अरबपती आहे. हॉलिवूडची सुपस्टार व अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नावाचा समावेश असणारी अभिनेत्री काइली जेनर अभिनयासोबत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. २१ वर्षीय काइली ही अमेरिकन टीव्ही स्टार असण्यासोबतच किम, कोल आणि कर्टनी कार्दिशिया यांची सावत्र बहीण आहे, काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे.


काइली जेनरने अलीकडेच तिच्या घराच्या बाथरूमचा एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिसत असलेले बाथरुमही आलिशान आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये शॉवरमधून पाणी पडताना दिसत आहे. हाच पॉइंट पकडून  नेटीझन्सने तिच्यावर निशाणा साधत जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली.  


35 मिलियन डॉलरच्या हवेलीमध्ये वास्तव्य असूनही, काइली जेनरचे घर मात्र अगदी सामान्य नागरिकाच्या घरासारखेच आहे. बाथरुमधले शॉवरमध्येही सर्वसामान्यच्या घराप्रमाणेच  कमी दाबाप्रमाणेच पाणी येते. तर काहीनी इतरांप्रमाणे कायलीला देखील स्लो इंटरनेट  सारख्या नॉर्मल गोष्टींचादेखील सामना करावा लागत असणार. सध्या वेगवेगळ्या गोष्टी गृहित धरत तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 


मेकअप इंडस्ट्रीची क्वीन काइली जेनर 'काइली कॉस्मेटिक्स' नावाच्या कंपनीची मालकीण आहे. तिने तीन वर्षांआधी म्हणजे २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. सध्या या कंपनीची व्हॅल्यू ९० कोटी डॉलर(६४ अरब रूपये) इतकी असल्याचं सांगितली जाते. काइलीचे ब्यूटी प्रॉडक्ट वापरणाऱ्यांमध्ये श्रींमत लोकांचा भरना जास्त आहे.

काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता.२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रैविस स्कॉटसोबत ती जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ती वेगळी झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kylie Jenner trolled by fans on twitter over shower Pressure Recent Bathroom Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.