काइली जगातील सर्वात कमी वय असणारी अरबपती आहे. हॉलिवूडची सुपस्टार व अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नावाचा समावेश असणारी अभिनेत्री काइली जेनर अभिनयासोबत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी नेटीझन्स तिचे कौतुक करताना नाही तर तिच्यावर निशाणा साधताना दिसतायेत. त्याचे झाले असे की, काइलीने मेकअप आर्टीस्टच्या सर्जरीसाठी पैस्यांची गरज असल्याची पोस्ट शेअर करत मदतीसाठी आव्हान केले. ही पोस्ट पाहून सा-यांनीच आश्चर्य व्यक्त केली. 

 


जी दिवसाला लाखों डॉलरमध्ये कमाई करते तिच्याकडे मेकअप आर्टीस्टवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत हे सगळे वाचून आश्चर्याचा धक्काच चाहत्यांना बसला आहे. पोस्ट वाचल्यानंतर नेटीझन्स तिच्यावरच संताप व्यक्त करत आहेत.

 

काइलीने ५ हजार डॉलर सर्जरीसाठी मदत केली आहे. मात्र इतकी श्रीमंत असूनही काइलीने मदतीसाठी चाहत्यांना सांगणे हे काही चाहत्यांना रुचले नाही. काइलीवर निशाणा साधत अनेकांनी ट्विट करत तिचा ट्रोलही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


सोशल मीडियावर सध्या नेटीझन्स टीका करताना दिसत आहे. काही युजर्स म्हणतायेत अरबपती असूनही मित्रासाठी पैसे नाहीत काइलीसाठी गोष्ट नक्कीच लज्जास्पद आहे. आज काइलीसाठी जितका आदर होता तो सगळा संपला आहे. जी सेंकदात ही रक्कम खर्च करु शकते, मात्र मित्रासाठी पैसे नसल्याचा आव आणते ही असली कसली अरबपती सेलिब्रेटी. 


काइलीने 2020 या वर्षात 590 मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली होती. काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे. मेकअप इंडस्ट्रीची क्वीन काइली जेनर 'काइली कॉस्मेटिक्स' नावाच्या कंपनीची मालकीण आहे.

 

तिने  वर्षांआधी म्हणजे २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. सध्या या कंपनीची व्हॅल्यू ९० कोटी डॉलर(६४ अरब रूपये) इतकी असल्याचं सांगितली जाते. काइलीचे ब्यूटी प्रॉडक्ट वापरणाऱ्यांमध्ये श्रींमत लोकांचा भरना जास्त आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kylie Jenner trolled for asking donation for her make-up artist though been billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.