हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. दररोज ती तिचे बोल्ड फोटोज इन्स्टावर शेअर करते आणि चर्चेचा विषय ठरते. तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. किमला तिच्या लूकसोबत नेहमीच एक्सपेरिमेंट करताना दिसते. 


यावर्षी तिने पॅरिस फॅशन विकमध्ये किम लेटेक्ससे बनवलेला बॉडिसूट घालून हजेरी लावली होती. आता तिने एक व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे की हा आऊटफिट घालण्यासाठी तिला किती त्रास झाला ते.  


व्हिडीओमध्ये किम आपल्या क्रू मेंबर्ससोबत दिसतेय. सगळे मिळून त्या बॉडिसूटला वर खेचण्याचा प्रयत्न करतायेत. किम म्हणाली, ''हा ड्रेस माझ्या स्किनला चिटकला. मला वाटते की माझ्या खांद्याचा स्नायू ताणला गेला आहे.'' व्हिडीओला पाहून सगळ्यांना खूप त्रास झाल्याचा अंदाज येतो आहे.  


किमची बहिण कोर्टनी सुद्धा तिला त्रस्त झालेली पाहतेय. त्यावर ती म्हणतेय, जर तुला वाशरुमला जावंस वाटले तरी तुला थांबवावी लागेल. त्यावर किमला समजलं की तिला खरंच वाशरुमला सुद्धा जाता येणार नाहीय. 


किमने रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टसोबत २०१४ मध्ये लग्न केले. याआधी किमची दोन लग्नं झाली होती. किम नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kim kardashians latex bodysuit nightmare fans make fun video gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.