बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग ते हटके लूक करतात तर कधी फोटोशूट. हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

दररोज ती तिचे बोल्ड फोटोज इन्स्टावर शेअर करते आणि चर्चेचा विषय ठरते. तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. किमला तिच्या लूकसोबत नेहमीच एक्सपेरिमेंट करताना दिसते. आपल्या हॉटमुळे  जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या किम कार्दिशियनने बालपणीचा फोटो टाकून अनेकांना धक्का दिला आहे. किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.  या फोटोमुळे किम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

फोटो पाहून ती किमच आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. फोटोत सफेद शर्ट त्यावर ब्लेझर आणि केस मोकळे सोडलेले अशा अंदाजात किम दिसते आहे. 


काही महिन्यांपूर्वी किमची पॅरिस फॅशन विकमध्ये फजिती झाले होती.  किमने लेटेक्ससे बनवलेला बॉडिसूट घालून हजेरी लावली होती. या आऊटफिटमुळे तिला वॉशरुमला जाणे ही डोकेदुखील ठरले होते. किमचा बॉडिसूट घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kim kardashian shared her throwback childhood photo gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.