कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यात व्हायरसचे सर्वात जास्त संक्रमण अमेरिका आणि इटलीमध्ये पाहायला मिळाले. या व्हायरसमुळे अनेकांचा बळी गेला आहे. अशात फक्त बॉलिवूड सेलिब्रेटीच नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टनने या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

जेनिफरने या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी फंड जमा करण्याकरता आपल्या न्यूड फोटोचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफरचे हे फोटो 1995 मधील आहेत. त्यावेळी जेनिफर तिचा टीव्ही शो फ्रेंड्समुळे चर्चेत आली होती. तिने सांगितले की या फोटोंच्या लिलावातून तिला जी रक्कम मिळणार आहे ती संपूर्ण रक्कम कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी देणार आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर सांगितले.


जेनिफरने इंस्टाग्रामवर सांगितले की, माझा मित्र मार्कने काही निवडक 25 फोटोंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात एक फोटो माझा सुद्धा आहे. मार्कने हा लिलाव करण्याचा निर्णय कोरोना रिलीफ फंड जमवण्यासाठी घेतला आहे. या लिलावातून मिळाणारी सर्व रक्कम ही एका अशा संस्थेला दिली जाणार आहे जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांचे मोफत कोरोना व्हायरस टेस्टिंग आणि उपचार देतील. धन्यवाद मार्क. या फोटोची सुरुवातीची किंमत 6500 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे.


या पोस्टसोबत जेनिफरने एक व्हिडीओ आणि आपला फोटो सुद्धा पोस्ट केला आहे. जो या लिलावात जाणार आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर सर्वजण खूप कौतूक करत आहेत.


जेनिफर अ‍ॅनिस्टनने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले होते. ज्यानंतर अगदी कमी वेळात म्हणजे 5 तास 16 मिनिटांत 1 मिलियन फॉलोवर्सचे रेकॉर्ड केले होते. यासाठी तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jennifer Aniston auctions off nude portrait of herself for coronavirus relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.