ठळक मुद्देहेलन यांचे 52 व्या वर्षी निधन झाले. हेलन यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाची झाली होती.

हॅरी पॉटर या चित्रपटाचे सगळेच भाग प्रचंड गाजले आहेत. या चित्रपटाची कथा, चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. हॅरी पॉटर या चित्रपटातील सगळ्याच भागांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री हेलेन यांचे निधन झाले असून त्यांच्या पतीनेच सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी दिली आहे. 

हेलन यांचे 52 व्या वर्षी निधन झाले. हेलन यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाची लागण झाली होती. शुक्रवारी हेलेन यांचे पती डेमियन लुइस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हेलेन यांचे निधन झाल्याची माहिती दिली. हेलन यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. 

हेलन यांचे पती डेमियन लुइस यांनी ट्विटरवर पोस्ट केली असून त्यात लिहिले आहे की, ‘मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी पत्नी हेलेनचे निधन झाले आहे. तिने राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. मी स्वत:ला भाग्यवान समजेन की ती आमच्या आयुष्यात होती.’

हेलेनच्या निधनानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे सामान्य लोकांनी तसेच कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

हेलेन या हॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यांनी ‘पीकी ब्लाइंडर्स’, ‘स्कायफॉल’, ‘ह्यूगो’, ‘द क्वीन’ आणि ‘द स्पेशल रिलेशनशिप’मध्ये काम केले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Harry Potter actress Helen McCrory dies of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.