सर्जरी करून ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरूष, आता सिक्स पॅक अ‍ॅब्जमधला फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:27 PM2021-05-28T17:27:05+5:302021-05-28T17:27:46+5:30

या अभिनेत्रीने लिंग बदल केल्यानंतर आता सिक्स पॅक अ‍ॅब्जमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

This famous actress became a man through surgery, now she shared a photo in Six Pack Abs | सर्जरी करून ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरूष, आता सिक्स पॅक अ‍ॅब्जमधला फोटो केला शेअर

सर्जरी करून ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरूष, आता सिक्स पॅक अ‍ॅब्जमधला फोटो केला शेअर

Next

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री एलेन पेज हिने लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे. इतकेच नाहीतर शस्त्रक्रियेनंतर तिने आपले नाव बदलले आहे. एलट असे केले आहे. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एलटने त्याचे सिक्स अ‍ॅब्ज दाखवताना दिसतो आहे. मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये एलनने सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना लिंग बदल शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. एलनच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. शस्त्रक्रियेनंतर आता पहिल्यांदाच एलटने स्वत:चा एक शर्टलेस फोटो शेअर केलाय.


ओपेरा विन्फ्रेने घेतलेल्या मुलाखतीत एलट म्हणाली होती की, ती कुमारवयात असताना तिच्या शरीरामध्ये जे बदल होत होते त्यामुळे ती अस्वस्थ होती. त्याकाळात ती एखाद्या टॉमबॉय सारखी राहात होती. हॉलिवूडपटात तिने काम करायला सुरुवात केली. तिला अभिनेत्री म्हणून खूप लोकप्रियता मिळाली मात्र खासगी आयुष्यात ती खूप बेचैन होती.


या मुलाखतीत तिने सांगितले की, २००७ मध्ये मी जुनो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऑस्करच्या रेड कार्पेटवर ड्रेस परिधान करून आली होती. मात्र त्यावेळचे स्वतःचे फोटो मी पाहू शकले नाही. त्यानंतर काही वर्षांनी इन्सेप्शन चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मी मुलीचा ड्रेस घातला होता. पण त्यामुळे मला पॅनिक अ‍ॅटॅक आला होता. पार्टीनंतर मला खूप घुसमटल्यासारखे झाले होते. मुलींचे ड्रेस घातल्यावर मला खूपच कसे तरी व्हायचे. 


तिने लिंग बदल शस्त्रक्रियेबद्दल सांगितले की, या ऑपरेशन नंतर मी स्वतःला नव्याने गवसले आहे. जेव्हा मी तरुण होते तेव्हा मानसिक पातळीवर मला खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या भावना, त्यांचा संघर्ष मी समजून घेऊ शकले आणि त्यांना माझा कायम पाठिंबा असणार आहे.


एलटने २०१४ साली लेस्बियन असल्याचे जाहीर केले होते. तिने डान्सर एम्मा पोर्टरबरोबर २०१८ मध्ये लग्नही केले होते. मात्र २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तर २०२० मध्ये तिने इन्स्टाग्रामवर ट्रान्सजेंडर असून लिंगबदलाचे ऑपरेशन करणार असल्याचे जाहीर केले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This famous actress became a man through surgery, now she shared a photo in Six Pack Abs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app