Coronavirus: कॅन्सरवर केली मात पण कोरोनाने केला घात, हॉलिवूड कलाकार टैरेंस मैकनलींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:19 PM2020-03-25T17:19:33+5:302020-03-25T17:19:54+5:30

कोरोना व्हायरसमुळे टैरेंस मैकनली यांचे निधन झाले

Coronavirus: Playwright Terrence McNally dies aged 81 of coronavirus complications Tjl | Coronavirus: कॅन्सरवर केली मात पण कोरोनाने केला घात, हॉलिवूड कलाकार टैरेंस मैकनलींचे निधन

Coronavirus: कॅन्सरवर केली मात पण कोरोनाने केला घात, हॉलिवूड कलाकार टैरेंस मैकनलींचे निधन

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं सावट आहे. यादरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज अमेरिकन स्क्रीन रायटर टैरेंस मैकनली यांचे कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे निधन झाले आहे. टैरेंस यांचे वय 81 वर्षे होते. फ्लोरिडामधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टैरेंस यांना प्रतिष्ठित एमी व टोनी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. टैरेंस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, टैरेंस फुफ्फुसाच्या कर्करोगातून बरे झाले होते. मात्र सोशल मीडियावर टैरेंस यांच्या निधनाचे वृत्त पसरले तर त्यांचे चाहते व सेलिब्रेटींना धक्का बसला. सर्वांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.


टैरेंस यांना द बार्ड ऑफ अमेरिकन थिएटर असेही संबोधत जात होते. ते इंडस्ट्रीत 60 वर्षे कार्यरत होते. त्यांचे नाटक, ओपेरा आणि म्युझिकल्स जगभरात सादर केले जात होते. टैरेंस प्रेम, एड्स, होमोफोबिया यांसारख्या कंटेटबद्दल लिहायचे. त्यांच्या कौतुकास्पद ठरलेल्या कामांमध्ये लव वैलोर कंपैशन नाटक, मास्टर क्लास याशिवाय बुक किस ऑफ द स्पायडरवुमन व रॅगटाईम यांचा समावेश आहे.


कोरोनाबद्दल सांगायचं तर कित्येक हॉलिवूडचे सेलिब्रेटी कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले आहेत. यात टॉम हँक्स, हार्वे वीन्सटीन यासारख्या कलाकारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांना आइसोलेशनमध्ये ठेवले आहे. कोरोना लहान मुले, पन्नाशी ओलांडलेल्या लोकांसाठी सर्वात जास्त घातक आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सुपर पावर म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेसह जगातील तब्बल194 देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात आडकले आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत जगात तब्बल 18,906 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,23,142 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: Coronavirus: Playwright Terrence McNally dies aged 81 of coronavirus complications Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.