Avengers: Endgame beats Titanic to become the 2nd highest grosser of all time at the worldwide box office | ‘टायटॅनिक’ ला मागे टाकत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ बनला जगातील सर्वात मोठा दुसरा चित्रपट!
‘टायटॅनिक’ ला मागे टाकत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ बनला जगातील सर्वात मोठा दुसरा चित्रपट!

ठळक मुद्दे‘टायटॅनिक’ हा कधीकाळी जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याकाळात या चित्रपटाने १५३ अब्ज रूपयांचा  बिझनेस केला होता.

मार्वेल स्टुडिओचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट ग्लोबल बॉक्सआॅफिसवर नॉनस्टॉप कमाई करतोय. भारतीय बाजारात या चित्रपटाने रविवारपर्यंत ३७२.५६  कोटींची कमाई केली आणि जगभरात हा आकडा १५३ अब्जांवर पोहोचला.  ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत असताना आता या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कमाईचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. 

 ‘टायटॅनिक’ हा कधीकाळी जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याकाळात या चित्रपटाने १५३ अब्ज रूपयांचा  बिझनेस केला होता. पुढे ‘अवतार’ या हॉलिवूडपटाने ‘टायटॅनिक’ला मागे टाकले आणि सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत ‘टायटॅनिक’ दुसºया क्रमांकावर फेकला गेला. आता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने १५३ अब्ज कमाईसह ‘टायटॅनिक’ला तिसºया क्रमांकावर ढकलले आहे. आता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ जगातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. शिवाय  जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याकडे त्याची घोडदौड सुरु आहे..
सध्या ‘अवतार’ हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने सुमारे १९५ अब्ज रूपयांचा बिझनेस केला होता. आजपर्यंत कुठलाही चित्रपट ‘अवतार’च्या या विक्रमाची बरोबरी करू शकला नव्हता. पण जाणकारांच्या मते,‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ लवकरच ‘अवतार’ला मागे टाकत हा रेकॉर्ड आपल्या नावावर करेल. 
 
भारतात ३०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट
भारतातही ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने एक नवा किर्तीमान स्थापित केला आहे. बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड ध्वस्त करत,‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ भारतात ३०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट बनला आहे. काल रविवारपर्यंत या चित्रपटाने भारतात ३७२.५६ कोटींचा बिझनेस केला.


Web Title: Avengers: Endgame beats Titanic to become the 2nd highest grosser of all time at the worldwide box office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.