गुढ रहस्यांनी भरलेले अ‍ॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. होय, या जंगलात लागलेली भीषण आग हे यामागचे कारण आहे. खरे तर याआधीही या जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत. पण सध्याची आग इतकी भीषण आहे की, ब्राझिलचे साओ पाउलो धुरामुळे अंधारात डुंबले आहे. अवकाशातूनही धूर दिसतो आहे.

अ‍ॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करते. मात्र सध्या हे वर्षावन आगीने धुमसतंय. यामुळेच ट्विटरवर  #PrayForTheAmazonहा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनेही अ‍ॅमेझॉनमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इंग्रजी वेबसाईट व्हॅरायटीच्या वृत्तानुसार, आता हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकैप्रियोने अॅमेझॉन जंगलाच्या संरक्षणासाठी ५ मिलियन डॉलर म्हणजे ३६ कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

लिओनार्डोने अ‍ॅमेझॉन जंगलच्या मदतीसाठी उचललेल्या पावलासाठी त्याचं सोशल मीडियावर खूप कौतूक होत आहे. लिओनार्डोकडून दिला जाणारा निधी पाच स्थानिक संस्थाना दिला जाणार आहे. ही माहितीदेखील खुद्द लिओनार्डो डिकैप्रियोने सोशल मीडियावर दिली आहे. 


अ‍ॅमेझॉन जंगलला लागलेली आग ब्राझील व बोलिवियानंतर पराग्वेपर्यंत पसरली आहे. आगीमुळे ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात अंधार पसरला आहे. 


आग विझवावी या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही आग गेल्या आठ दिवसांत १४ हजार वर्ग किलोमीटरपर्यंत पसरली आहे. 

English summary :
Amazon Forest Fire: Amazon forest which is one of the big forest suffering from fire. Hollywood star Leonardo DiCaprio has decided to donate $ 5 million dollars, to protect the Amazon forest. The hashtag #PrayForTheAmazon is trending on Twitter. Funds from Leonardo will be donated to five local organizations.


Web Title: Amazon Rainforest Fire: Leonardo DiCaprio Donates 5 Million Dollars For Amazon Rainforest Fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.