Adult Film Star Jessica Jaymes Found Unconscious At Her San Fernando Valley Home | अ‍ॅडल्ट चित्रपटातील या अभिनेत्रीचं झालं निधन, तिच्या मृत्यूचा तपास करताहेत पोलीस
अ‍ॅडल्ट चित्रपटातील या अभिनेत्रीचं झालं निधन, तिच्या मृत्यूचा तपास करताहेत पोलीस

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जेसिका जयम्सचं निधन झाल्याचं समजतं आहे. जेसिका अ‍ॅडल्ट चित्रपटांव्यतिरिक्त  'वीड्स इज डेड' शोमध्ये देखील झळकली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसिका कॅलिफोर्नियातील तिच्या घरी मृत अवस्थेत पडलेली होती. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


जेसिका मायकल रेडिंगला जेसिका जयम्स या नावानं ओळखलं जातं. रिपोर्ट्समध्ये सांगितलं आहे की, जेसिका कॅलिफोर्नियातील सॅन फर्नांडो घाटी येथील हेवेनहस्र्ट एव्हेन्यू ९०० ब्लॉकमधील तिच्या घरी ती मृत अवस्थेत सापडली. त्यानंतर डॉक्टरांनी तपास केल्यानंतर तिला मृत घोषित केलं होतं. 


'द ब्लास्ट'च्या रिपोर्टनुसार, जेसिकाची तिच्या नवऱ्यासोबत गेल्या काही दिवसांपासून बातचीत झाली नव्हती. त्यानंतर ते भेटण्यासाठी घरी पोहचले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. जेसिकाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.याचा तपास पोलीस लावत आहेत.
जेसिकाचा जन्म अलास्कामधील एंकोरेजमध्ये झाला. त्यानंतर तिने २००२ मध्ये अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये काम करायला सुरूवात केली होती. जेसिका ‘हसलर हनी ऑफ द ईयर’चा किताब जिंकली आहे. 
 अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत खूप वेळ काम करत २००८मध्ये जेसिकाने स्वतःचा अ‍ॅडल्ट फिल्म स्टुडिओ सुरू केला होता. तिला या इंडस्ट्रीत खूप ओळख मिळाली. 


Web Title: Adult Film Star Jessica Jaymes Found Unconscious At Her San Fernando Valley Home
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.