दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा उलगडा; सराईत मोटारसायकल चोरट्यास पकडले
By कपिल केकत | Updated: July 18, 2024 20:10 IST2024-07-18T20:10:21+5:302024-07-18T20:10:42+5:30
चोरीच्या दोन मोटारसायकल हस्तगत.

दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा उलगडा; सराईत मोटारसायकल चोरट्यास पकडले
गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या दोन घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरट्यास पकडले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनगर गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी पंकज मिलकीराम सूर्यवंशी (२३,रा. मुंडीपार-खुर्द) याला ताब्यात घेतले.
त्याची रामनगर ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरी प्रकरणांना घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली २० हजार रूपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-यू ३३३५ तसेच ७० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एयू ३०२८ हस्तगत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर व पोलिस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात बाळकृष्ण राऊत, छत्रपाल फुलबांधे, कपिल नागपुरे यांनी ही कारवाई केली आहे.