पैशांची परतफेड न करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तिघांवर बळजबरीचा गुन्हा
By नरेश रहिले | Updated: August 12, 2023 18:28 IST2023-08-12T18:26:17+5:302023-08-12T18:28:19+5:30
सतोना येथील घटना

पैशांची परतफेड न करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तिघांवर बळजबरीचा गुन्हा
गोंदिया : उधार उसनवारी घेतलेल्या पैशांची परतफेड न करणाऱ्या एका ४२ वर्षांच्या महिलेवर तीन नराधमांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया तालुक्यातील सतोना येथे घडली. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी तीन नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुलाच्या उपचारांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये गावातीलच ४२ वर्षांच्या पीडित महिलेने आरोपींकडून उधार उसनवारी पैसे घेतले होते. ते पैसे ती परतफेड करू शकली नाही. त्या मोबदल्यात दोन आरोपी तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करायचे. आरोपी देवेंद्र उर्फ बंडू नगारची मानकर (५०) व राजू ढिमरू मानकर (४८) दोन्ही रा. सतोना हे सप्टेंबर २०१२ पासून मार्च २०२३ या काळात दोन आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. कधी शेतात तर कधी घरी तिला फोन करून बोलवायचे आणि तिच्यावर अतिप्रसंग करायचे. तिने टाळण्याचा प्रयत्न केल्यास तिला फाेनवर आरोपी धमकी द्यायचे.
९ ऑगस्ट रोजी तिला रात्री ८:११ वाजता तिला शेतातील उसाच्या वाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार नेहमी पाहणारा आरोपी अशोक भगळू मरठे (५०) रा. सातोना यानेही तिला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांवर रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (२), (एन), ३५४ (अ), ४५०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ करीत आहेत.