फ्रिजमध्ये भिजवून ठेवलेला कणकेचा गोळा बिघडवू शकतो तुमच्या कुटुंबाचे आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:52 IST2025-03-28T15:51:15+5:302025-03-28T15:52:30+5:30

Gondia : भिजवलेल्या पिठात बॅक्टेरिया होण्याची शक्यता

Dough balls left soaking in the fridge can ruin your family's health | फ्रिजमध्ये भिजवून ठेवलेला कणकेचा गोळा बिघडवू शकतो तुमच्या कुटुंबाचे आरोग्य

Dough balls left soaking in the fridge can ruin your family's health

गोंदिया : वेळ वाचविण्यासाठी अनेक महिला एकदाच कणकेचा गोळा तयार करून तो फ्रीजमध्ये ठेवतात. त्यानंतर सकाळी केलेली कणीक सायंकाळी पोळ्या करण्यासाठी वापरतात; परंतु असे करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे.


फ्रीजमध्ये रेफ्रिजरंट वायूंचा वापर
फ्रीज थंड ठेवण्यासाठी रेफ्रीजरंट गॅसचा उपयोग केला जातो. फ्रीजमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोकार्बन अशा विविध रेफ्रीजरंट वायूचा उपयोग केला जातो. फ्रीज खराब झाले असेल, फ्रीजमधून गॅस लीक होत असेल, फ्रीजमधून खराब वास येत असेल तर अशा वेळी फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थावरही त्याचा हानिकारक परिणाम होतो.


भिजवलेल्या पिठात बॅक्टेरिया होण्याची शक्यता
पीठ भिजवून ती कणिक अधिक वेळपर्यंत ठेवल्याने त्या पिठात हानिकारक जीवजंतू, बुरशी लागते. अनेकदा आपल्याला कणीक बघितल्यानंतर हे लक्षातही येत नाही. त्याची पोळी खाल्ल्यानंतर चव बदललेली लक्षात येते.


क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) घातक
सुरुवातीला व्यावसायिक पातळीवर क्लोरोफ्लोरो कार्बनचा रेफ्रीजरंट म्हणून उपयोग केला जात होता; परंतु आधुनिक काळात नव्या मॉडेलमध्ये याचा उपयोग केला जात नाही.


हा कणकेचा गोळा बिघडवेल कुटुंबाचे आरोग्य
रोज कणकेचा गोळा फ्रीजमध्ये ठेवून त्याची पोळी खाण्याची सवय असेल तर त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.


"वेळ आणि कार्यशक्ती वाचविण्यासाठी आज काही घरात एकदाच खूप कणिक भिजवून तो गोळा दोन-तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवला जातो. सातत्याने फ्रीजमध्ये अधिक वेळ कणीक ठेवून त्याच्या पोळ्या खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, मळमळ, भूक न लागणे अशा आरोग्याच्या तक्रारी भेडसावू शकतात."
- डॉ. स्वाती चव्हाण, आहारतज्ज्ञ गोंदिया

Web Title: Dough balls left soaking in the fridge can ruin your family's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.