पंतप्रधान मोदींची आज सांकवाळला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2024 12:47 IST2024-04-27T12:45:44+5:302024-04-27T12:47:48+5:30

या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वाहतूक अन्य मार्गावर वळवली जाईल.

pm narendra modi rally at sankwal today for goa lok sabha election 2024 | पंतप्रधान मोदींची आज सांकवाळला सभा

पंतप्रधान मोदींची आज सांकवाळला सभा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुरगाव तालुक्यात सांकवाळ येथे बिर्ला मंदिरासमोरील खुल्या जागेत जाहीर सभा होणार असून, या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असलेले पंतप्रधान गोवेकरांना काय 'गॅरंटी' देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. पंतप्रधानांची सभा दक्षिण गोव्यात आयोजित करण्याचा हाही एक भाग आहे. सभेला मोठ्या संख्येने गर्दी जमविण्यासाठी भाजपचे मंत्री, आमदार कामाला लागले आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती या सभेला लाभणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेला आहे.

मार्गात बदल

मोदींच्या आगमनामुळे आज दुपारी १ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दाबोळी जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शनपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद राहील. बिर्ला टायटन जंक्शन ते दाबोळी जंक्शन रस्ता बंद राहील. वाहतूक अन्य मार्गावर वळवली जाईल.
 

Web Title: pm narendra modi rally at sankwal today for goa lok sabha election 2024