मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 16, 2024 17:08 IST2024-04-16T17:07:42+5:302024-04-16T17:08:20+5:30
लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: गोवा सचिवालयाच्या सचिव नम्रता उलमन यांच्या मागोमाग आता गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी राकेश वर्मा यांचा बनावट व्हॉट्सअप अकाऊंट तयार करुन लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी ९७७९८२६५८११३९ या क्रमांकधारकाविरोधात वर्मा यांचा बनावट व्हॉट्सअप अकाऊंट तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करीत आहेत.या अकाऊंटव्दारे पैसे मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वर्मा यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट तयार केल्याचे समजले.
मागील दोन दिवसांत सरकारमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल हॅक करुन त्याआधारे लोकांकडून पैसे उकळण्याचा हा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे गोवा पोलिसां समोर तपासाबाबत आव्हान निर्माण झाले आहे. पर्वरी येथील गोवा सचिवालयाच्या सचिव नम्रता उलमन यांचा मोबाील क्रमांक काही अज्ञातांनी हॅक केल्यप्रकरणी पर्वरी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.