काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 22, 2024 14:01 IST2024-03-22T14:01:14+5:302024-03-22T14:01:37+5:30
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आपल्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्याविरोधात किती तक्रारी केल्या तरी फरक पडत नाही. त्यांनी ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहे.
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवाराचे नाव ठरवेल. गोव्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार पुढील यादीत उमेदवाराचे नाव जाहीर होईल असे त्यांनी सांगितले.
तानावडे म्हणाले, की भाजप उमेदवाराच्या नावाची घाेषणा करण्यास विलंब करीत असल्याची टीका कॉंग्रेस करीत आहे. प्रत्यक्षात मात्र कॉंग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. कॉंग्रेसचे तिकिट घेण्यास कोणच इच्छुक नाही. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात ही स्थिती आहे. भाजप जिंकण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. तर कॉंग्रेस केवळ निवडणूक लढवण्यासाठी निवडणूकीत उतरत असल्याची टीका त्यांनी केली.