भाजप-काँग्रेसकडून विजयाचे दावे, सासष्टी तालुक्यात तुलनेने कमी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:45 AM2024-05-08T09:45:39+5:302024-05-08T09:47:06+5:30

हिंदू प्रभावित मतदारसंघांमधील प्रचंड मतदानाचा भाजपला लाभ शक्य

bjp congress claims victory for goa lok sabha election 2024 | भाजप-काँग्रेसकडून विजयाचे दावे, सासष्टी तालुक्यात तुलनेने कमी मतदान

भाजप-काँग्रेसकडून विजयाचे दावे, सासष्टी तालुक्यात तुलनेने कमी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हिंदू बहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानाचा लाभ भाजप उमेदवारांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मतदानानंतर भाजप व काँग्रेसने विजयाचे दावे केले असले, तरी ४ जूनला प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. हिंदूबहुल मतदारसंघांमध्ये जास्त मतदान झाल्याने भाजपला विजयाची अधिक शक्यता त्या पक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत. सासष्टीत तुलनेने कमी मतदान झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांचा १ लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने, तर दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे यांचा ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजय होईल. भाजपच्या बुध कार्यकत्यांपासून पन्नाप्रमुखाने मतदान वाढवण्यासाठी परिश्रम घेतले, त्याचा परिणाम म्हणून विक्रमी मतदान झाले आहे.

मुख्यमंत्री, सर्व आमदार, कार्यकत्यांनी कष्ट घेतले. मोदींचे नेतृत्व हा एकस विषय लोकांसमोर ठेवून भाजपने ही निवडणूक लढविली स्थानिक पातळीवर मुख्यमंत्र्यांनीही आपल्या चांगल्या नेतृत्वाबद्दल शिक्कामोर्तब केल्याचे तानावडे म्हणाले. भाजपचे माजी केंद्रीय नेते सुरेश प्रभू यांनी गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार, असा दावा करताना मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी देशभरात फार मोठी लाट आहे आणि गोव्यातही ही लाट आपल्याला दिसल्याचे नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाला मोदी हैच पंतप्रधान व्हावे, असे वाटत असल्याचे प्रभू म्हणाले.

शहरी भागापेक्षा झोपडपट्टी परिसरात सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठांसाठी लिंबूपाण्याची सोय. काही ठिकाणी बोटावर लावलेली शाई गेल्यामुळे काँग्रेसची तक्रार. राज्यात दुपारी १२ पर्यंत तसेच ३.३० नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले.

३० हजारांचे मताधिक्क्य मिळेल : रमाकांत खलप

उत्तर गोव्यात काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी यावेळी भाजप विरुद्धचा राग निकालातून दिसून येईल, असा दावा करताना आपण विजयाबाबत निश्चित असल्याचे सांगितले. खलप माणाले की, विक्रमी मतदानातून प्रस्थापिताविरुद्धची लाट दिसून येत असून, कमीत कमी ३० हजार मताधिक्याने मी विजयी होईन, सामाता विलास आहे. २० नंतर आपण असा निवडणूक लववताना पाहून जनता उत्साहित दिसली.

काब्राल यांची 'चर्च'वर तोफ

कुडचद्वेचे आमदार तया माजी बांधकाम मंत्री नौलेश काब्राल यानी असा आरोप केला की, चर्चमधून धर्मगुरूनी भाजपला मतदान करू नका, असे सांगितले आहे. माइयाकडे त्यासंबंधीचे पुरावेही आहेत व गरज पडल्यास ते उघड करीन, धार्मिक संस्थांकडून असे आवाहन करणे चुकीचे असल्याचे काळात म्हणाले.

श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार: तानावडे

श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार. भाजपच्या सर्व मंत्री आमदारांनी तसेच भाजपसोबत असलेल्या सर्वांनी स्वत्चीच निदडणूक असल्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात ओकून देऊन काम केले, भाजपच्या पन्ना प्रमुखांनीही शिग्लबहा काम केले. सगळे कार्यकर्ते वावरले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात मतदान आले. आम्ही दोन्ही जागा जिंकू, याविषयी मनात किंचितदेखील शंका नाही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांची गोव्यात झालेली सभाही आम्हाला खूप उपयुक्त ठरली, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले.
 

Web Title: bjp congress claims victory for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.