अमित शाह यांची गोव्यातील सभा पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2024 12:58 IST2024-04-22T12:57:59+5:302024-04-22T12:58:49+5:30

दक्षिण गोव्यात कुडचडे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्याचा विचार भाजपने चालवला आहे. परंतु ती तारीखही अद्याप ठरलेली नाही.

amit shah rally for lok sabha election 2024 in goa postponed | अमित शाह यांची गोव्यातील सभा पुढे ढकलली

अमित शाह यांची गोव्यातील सभा पुढे ढकलली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची म्हापसा येथे दि. २४ रोजी आयोजित जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. शाह यांच्या सभेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने उत्तर गोव्यात म्हापसा येथे आंतरराज्य बस स्थानकावर गुरुवार, २४ रोजी शाह यांची सभा आयोजित केली होती. या सभेसाठी तयारी चालू होती. परंतु शाह हे त्या दिवशी सभेसाठी येऊ शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले असून सभा लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यात कुडचडे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्याचा विचार भाजपने चालवला आहे. परंतु ती तारीखही अद्याप ठरलेली नाही.

 

Web Title: amit shah rally for lok sabha election 2024 in goa postponed