गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश

By किशोर कुबल | Updated: April 20, 2024 00:41 IST2024-04-20T00:40:49+5:302024-04-20T00:41:45+5:30

रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे.

40 star campaigner of Congress for Goa Including Sonia gandhi, Rahul gandhi, Priyanka gandhi and mallikarjun kharge | गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश

गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश

ir="ltr">किशोर कुबल, पणजी : इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड.रमाकांत खलप व विरीयातो फर्नांडिस यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने गोव्यासाठी ४० स्टार  प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी,  पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर व इतर केंद्रीय नेत्यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे तर दक्षिण गोवा मतदारसंघात विरियातो फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 

गोव्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी १९ रोजी अखेरची तारीख होती. दोन्ही मतदारसंघात मिळून १९ अर्ज दाखल झाले आहेत. शनिवार २० रोजी अर्जांची छाननी होणार असून सोमवार २२ रोजी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Web Title: 40 star campaigner of Congress for Goa Including Sonia gandhi, Rahul gandhi, Priyanka gandhi and mallikarjun kharge