राकेश बापटच्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? झळकणार ‘हे’ कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:16 PM2024-02-14T14:16:25+5:302024-02-14T14:18:48+5:30

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

Zee Marathi Launches New Marathi Serial Rakesh Bapat's Navri Mile Hitlerla new promo out | राकेश बापटच्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? झळकणार ‘हे’ कलाकार

राकेश बापटच्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? झळकणार ‘हे’ कलाकार

गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकांच्या चर्चा सुरू आहेत. नव्या मालिकांचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या नव्या मालिकांविषयी उत्सुकता वाढली आहे. नुकताच 'नवरी मिळे हिटलरला'  या नव्या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या नव्याकोऱ्या प्रोमोमधून प्रमुख भूमिकांसह महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा चेहरा उघड झाला आहे.

 'नवरी मिळे हिटलरला'  या मालिकेत अभिनेता राकेश बापट हा AJ ची अर्थात अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार आहे. तर राकेशसह या मालिकेत अभिनेत्री वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या दोन मुख्य कलाकारांशिवाय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे, अभिनेत्री भुमीजा पाटील आणि सानिका काशीकर यांची झलक पाहायला मिळाली. मालिकेत या तिघी नकारात्मक भूमिकेत झळकणार असल्याचं प्रथमदर्शनी  पाहायला मिळत आहे. 

मालिकेत AJ म्हमणजे मिस्टर परफेक्टशनिस्ट, डॅशिंग, अतिशय शिस्तबद्ध, आणि वक्तशीरपणा असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच  त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या सुनांनी सुरु केली आहे. तर मालिकेचे लेखन  सायली केदार यांनी केलं आहे. तर चंद्रकांत गायकवाड मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. तर हिटलर येतोय तुम्हाला भेटायला लवकरच फक्त झी मराठीवर.
 

Web Title: Zee Marathi Launches New Marathi Serial Rakesh Bapat's Navri Mile Hitlerla new promo out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.