ज्यात तुम्ही खुलून दिसता तीच तुमची स्टाइल- अमृता खानविलकर

By Admin | Updated: December 25, 2016 04:00 IST2016-12-25T04:00:33+5:302016-12-25T04:00:33+5:30

माझ्यासाठी स्टाईल हा खूप खाजगी आणि वैयक्तीक विषय आहे. मी लहान होते तेव्हापासूनच मला चांगले आणि स्टायलिश कपडे परिधान करणे आवडायचे. तीच सवय आजतागायत कायम आहे.

Your style, which you saw as open- Amrita Khanvilkar | ज्यात तुम्ही खुलून दिसता तीच तुमची स्टाइल- अमृता खानविलकर

ज्यात तुम्ही खुलून दिसता तीच तुमची स्टाइल- अमृता खानविलकर

माझ्यासाठी स्टाईल हा खूप खाजगी आणि वैयक्तीक विषय आहे. मी लहान होते तेव्हापासूनच मला चांगले आणि स्टायलिश कपडे परिधान करणे आवडायचे. तीच सवय आजतागायत कायम आहे. माझा लूक, कपडे आणि मेकअपवर निरनिराळे प्रयोग करणे मला भावते. सध्या तर माझ्या ड्रेसिंग स्टाइलवर माझा पती हिमांशूचा प्रभाव जास्त आहे. मला स्टायलिश बनवण्यात हिमांशूचा खारीचा वाटा आहे. आपल्या लूक्स आणि स्टाइलमुळे आपली ओळख आहे. त्यामुळेच आपल्याला पैसा, प्रसिद्धी मिळते असे त्याचे ठाम मत आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही स्टायलिश राहाल तितकेच तुम्हाला रसिकांचे प्रेम मिळेल असे त्याचे म्हणणे असते. ड्रेसिंग आणि स्टाइलमुळे व्यक्तिमत्त्व खुलून येते असेही तो मला वारंवार सांगतो. त्यामुळे सध्या माझा फॅशन गुरू म्हणा किंवा स्टाइल गुरू म्हणा तो माझा पती हिमांशूच आहे. सध्या प्रत्येकामध्ये फॅशन सेन्स पाहायला मिळतो. कॉलेजच्या तरुण, तरुणींपासून ते आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकालाच स्टाइल में रहना पसंत आहे. त्याप्रमाणेच मलाही स्टाइलमध्ये राहायला आवडते. नॉर्मल कपडे, वेस्टर्न मग टॉप, जीन्स घालणे मला आवडते. एखादा कार्यक्रम किंवा मग त्यावेळची परिस्थिती यावर माझी बहुतांशी ड्रेसिंग स्टाइल अवलंबून असते. अनेकांचा असा गैरसमज आहे की, ब्रँडेड कपडे परिधान केले तरच तुम्ही स्टायलिश वाटता. मात्र माझ्या मते स्टायलिश राहण्यासाठी ब्रँडेड कपड्यांची गरज नसते. मला जर फिरता फिरता रस्त्यावरचे कपडे आवडले तर तेसुद्धा मी विकत घेऊन घालण्यास मागेपुढे पाहात नाही. एखाद्या कपड्यात तुम्ही किती कम्फर्टेबल आहात, तुमचं व्यक्तिमत्त्व या कपड्यात खुलून येते की नाही हे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे लिंकिंग रोड असो किंवा इतर कोणतेही शॉपिंग मार्केट तिथून विंडो शॉपिंग करून मी कपडे खरेदी करते. दुसरे म्हणजे फिटनेसही तुमच्या स्टायलिश असण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. एकूणच काय तर मला स्टायलिश राहणे खूप खूप गरजेचे वाटते. ज्या क्षेत्रात मी काम करते त्या क्षेत्रासाठी तर स्टायलिश राहणे आवश्यकच आहे.

Web Title: Your style, which you saw as open- Amrita Khanvilkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.