यामीने नाकारला दिव्याचा चित्रपट
By Admin | Updated: November 20, 2014 00:42 IST2014-11-20T00:42:41+5:302014-11-20T00:42:41+5:30
अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आगामी चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीत काही अडचणी येत असल्याची बातमी आहे
_ns.jpg)
यामीने नाकारला दिव्याचा चित्रपट
अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आगामी चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीत काही अडचणी येत असल्याची बातमी आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दिव्याने पुलकित सम्राट आणि यामी गौतमशी संपर्क केला होता; पण काही वर्कशॉप्स केल्यानंतर यामीने हा चित्रपट नाकारलाय. हा चित्रपट नाकारणारी यामी पहिली हिरोईन नाही. यापूर्वी श्रुती हसन आणि अदिती राव हैदरी यांनी हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर करारावर सही करण्याच्या काही दिवसांआधीच यामीनेही हा चित्रपट सोडला. या तिघींनीही हा चित्रपट का नाकारला, हा मात्र प्रश्न आहे. यारियाँ या चित्रपटानंतर दिव्याचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट असणार आहे. सध्या ती या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे.