यामी गौतम गॅझेटप्रेमी नाही
By Admin | Updated: September 27, 2015 01:54 IST2015-09-27T01:54:08+5:302015-09-27T01:54:08+5:30
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम गॅझेट्सप्रेमी नाही. परंतु तिचे म्हणणे आहे की, आज आपण ज्या जगात जगतो आहोत तिथे गॅझेट्सचे फार महत्त्व आहे.

यामी गौतम गॅझेटप्रेमी नाही
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम गॅझेट्सप्रेमी नाही. परंतु तिचे म्हणणे आहे की, आज आपण ज्या जगात जगतो आहोत तिथे गॅझेट्सचे फार महत्त्व आहे. आज गॅझेट्सशिवाय जगणे फारच अवघड काम आहे. ‘विक्की डोनर’ फेम यामी गौतम म्हणाली, ‘मी गॅझेट्सप्रेमी बिल्कुल नाही. पण, याशिवाय आज जीवन व्यतित करणे काही सोपे नाही. मी आज जवळपास सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्सवर आहे, हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे कार्य करते.’ ती पुढे म्हणाली, ‘माझ्या व्यवसायात मला अनेक दिवसांपर्यंत घरापासून दूर राहावे लागते. अशातच आम्ही आपल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून कुटुंबीयांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकतो. व्हिडीओ कॉलही करू शकतो. मला हे असे करायला खूप चांगले वाटते.’ यामी एका आंतरराष्ट्रीय मोबाइल कंपनीच्या नव्या फोनच्या लाँचिंगसाठी आली होती. यामीच्या फिटनेसच्या मागे अनेक गॅझेट्सचा आधार आहे. मी काही दिवसांसाठी पहिल्यांदा घड्याळ खरेदी केले आहे. त्यातून तिने किती कॅलरी घटवली हे तिला कळते. यासोबतच हार्टबीटदेखील त्यातून कळतात.