WWE स्टार जॉन सीना 'डॅडीज होम-2' मध्ये झळकणार
By Admin | Updated: March 13, 2017 20:09 IST2017-03-13T20:07:12+5:302017-03-13T20:09:59+5:30
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये लोकप्रिय असलेला स्टार खेळाडू जॉन सीना आता एका चित्रपटातून पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

WWE स्टार जॉन सीना 'डॅडीज होम-2' मध्ये झळकणार
>ऑनलाइन लोकमत
लॉस एन्जेलिस, दि. 13 - वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये लोकप्रिय असलेला स्टार खेळाडू जॉन सीना आता एका चित्रपटातून पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये झळकणार आहे.
जॉन सीना याने 2015 मध्ये आलेल्या 'डॅडीज होम' या चित्रपटात लहानशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा याच चित्रपटाचा सीक्वल 'डॅडीज होम-2' येणार आहे. यामध्ये जॉन सीना दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात जॉन सीना याच्यासोबत अभिनेता विल फेरेल आणि मार्क वाल्बर्ग सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, 'डॅडीज होम-2' या चित्रपटाचे चित्रीकरण बोस्टन येथे सुरू होणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पुढील महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये होणाऱ्या 'रेसलमेनिया-33' ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या जॉन सीना 'रेसलमेनिया-33' च्या तयारीला लागला आहे.