स्त्री वेशात अतुल पडद्यावर करणार धमाल
By Admin | Updated: January 9, 2017 05:37 IST2017-01-09T05:37:47+5:302017-01-09T05:37:47+5:30
‘गं सहाजणी’ ही विनोदी मालिका सध्या प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतील पात्र आणि घडणाऱ्या घटना वास्तवाशी

स्त्री वेशात अतुल पडद्यावर करणार धमाल
‘गं सहाजणी’ ही विनोदी मालिका सध्या प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतील पात्र आणि घडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास होत असल्याने प्रेक्षक मालिकेतील पात्रांच्या प्रेमात पडले आहेत. आता अतुल तोडणकर हा विनोदी कलाकार मालिकेत रंगत आणण्यासाठी स्त्रीवेशात झळकणार आहे. त्याने त्याच्या स्त्रीवेशाचा एक फोटो नुकताच सोशलमीडियावर शेअर केला असून, त्याचा हा नवा अवतार प्रेक्षकांना खळखळून हसविणार, हे निश्चित. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत अतिशय खुबीने हाताळण्यात आला होता. बँकेचे खडूस मॅनेजर ‘धबडगावकर’ म्हणजेच अतुल तोडणकर यांची धमाल मस्ती तर या भागात चर्चेचा विषय ठरला होता. अतुलने आपल्या नेहमीच्या अंदाजात हास्यविनोदाच्या फटकाऱ्यात चलनबदलाचा गंभीर विषय मनोरंजक पद्धतीने हाताळला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या एपिसोडनंतर अतुल आता स्त्रीवेशात काय धमाल करणार, हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरेल.