ही तर सोनालीची इच्छा!
By Admin | Updated: March 12, 2015 23:26 IST2015-03-12T23:26:48+5:302015-03-12T23:26:48+5:30
अभिनयाच्या प्रांतात मोठी मुसंडी मारली, तरी सच्चा कलावंताला अधिक चांगल्या भूमिकेची आस असतेच. (सिनिअर) सोनाली कुलकर्णीचेही तसेच काहीसे झाले

ही तर सोनालीची इच्छा!
अभिनयाच्या प्रांतात मोठी मुसंडी मारली, तरी सच्चा कलावंताला अधिक चांगल्या भूमिकेची आस असतेच. (सिनिअर) सोनाली कुलकर्णीचेही तसेच काहीसे झाले. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्च्या २’ या चित्रपटात काम करण्याची इच्छाच तिने केदारजवळ बोलून दाखवली आणि त्याने ती मान्यही केली. केदारचा मित्रांचा गोतावळा मोठा असला तरी तो प्रथम कामावर प्रेम करणारा माणूस आहे आणि म्हणून मला त्याच्यासोबत काम करायचेच होते, असे सोनाली म्हणते. आता बोला!