होणार सून मी या घरची? खान कुटुंबियांसह लूलिया दिसली एअरपोर्टवर
By Admin | Updated: May 12, 2016 13:05 IST2016-05-12T12:15:16+5:302016-05-12T13:05:52+5:30
सलमान खानची आई सलमा यांच्यासह लूलिया वंतूर एअरपोर्टरवर एकत्र दिसल्याने लूलियाचा खान कुटुंबात समावेश झाल्याचे दिसत आहे.

होणार सून मी या घरची? खान कुटुंबियांसह लूलिया दिसली एअरपोर्टवर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू लागल्या असून या वर्षाखेरीस गर्लफ्रेंड लुलियासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी व्हायरल झाल्यावर सलमानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. खुद्द सलमानने मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र आता ही बातमी खरी ठरणार असल्याची चिन्हे आहेत, कारण नुकतीच सलमानची गर्लफ्रेंड लुलिया सलमानची आई सलमा खान यांच्या सोबत दिसली होती.
मुंबई एअरपोर्टवर सलमानची आई, बहीण व लुलिया यांना एकत्र टिपण्यात आले असून लुलिया सलमानच्या आईचा हात हातात घेऊन त्यांना आधार देत जात असल्याचे या फोटोत स्पष्ट दिसत आहे. यावेळी खान कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते, असं समजतं. त्यामुळे आत सर्वांनीच लुलिया व सलमानचे नाते स्वीकारले असून लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
वयाच्या पन्नाशीत पोहोचलेला सलमान त्याच्या आजारी आईसाठी विवाहाच्या निर्णयापर्यंत आला आहे. सलमानने आता घर-संसाराला लागावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. आपल्यानंतर सलमानची काळजी घेणारी कोणीतरी असावे असे त्याच्या आईला वाटते. त्यामुळेच बॉलिवूडचा हा बॅचलर खान लग्नास राजी झाल्याचे समजते.