मुलीपेक्षा बायको लहान
By Admin | Updated: January 20, 2015 22:46 IST2015-01-20T22:46:05+5:302015-01-20T22:46:05+5:30
बॉलीवूड जगतात लिंकअप्स आणि ब्रेकअप्स होण्याच्या घडामोडी तशा कॉमन आहेत. त्यातही एकाहून अधिक रिलेशनशिप्स काही मोठी गोष्ट राहिली नाही.

मुलीपेक्षा बायको लहान
बॉलीवूड जगतात लिंकअप्स आणि ब्रेकअप्स होण्याच्या घडामोडी तशा कॉमन आहेत. त्यातही एकाहून अधिक रिलेशनशिप्स काही मोठी गोष्ट राहिली नाही. एकेकाळी आपल्या बहारदार अभिनयाने आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने लाखो तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे (ज्येष्ठ?) अभिनेते कबीर बेदी यांनी नुकताच ६९ वा वाढदिवस साजरा केला. याहून अधिक मजेदार गोष्ट म्हणजे त्यांची चौथी पत्नी ब्रिटिश अभिनेत्री व मॉडेल परवीन दुसांज ही ४० वर्षांची असून मुलगी पूजा बेदी ही ४४ वर्षांची आहे. पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांच्यापासून पूजाचा जन्म झाला होता. त्यामुळेच ‘बेटी मॉँ से बडी’ अशी स्थिती बेदी कुटुंबात आहे.