करण देओलच्या रिसेप्शन पार्टी सलमान, आमिर आला; पण शाहरुख खान आला नाही; सनी देओल आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:00 PM2023-06-21T17:00:31+5:302023-06-21T17:13:55+5:30

सलमान खान आणि आमिर खानने करणच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. त्यामुळे शाहरुख खान कुठेच दिसला नाही. त्यामुळे तो का आला नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Why shah rukh khan was not invited in karan deol wedding reception is sunny deol reason | करण देओलच्या रिसेप्शन पार्टी सलमान, आमिर आला; पण शाहरुख खान आला नाही; सनी देओल आहे कारण

करण देओलच्या रिसेप्शन पार्टी सलमान, आमिर आला; पण शाहरुख खान आला नाही; सनी देओल आहे कारण

googlenewsNext

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा मुलगा करण देओलने द्रिशा आचार्यसोबत १८ जूनला लग्न केले. शाही थाटात पार पडलेल्या या लग्नाचे आणि रिसेप्शनचे बरेच इनसाईट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देओल कुटुंबाने संपूर्ण बॉलिवूडसाठी एक ग्रँड रिसेप्शन आयोजित केलं होतं. ज्यात सलमान खानपासून ते आमिर खान. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगपर्यंत अनेक कलाकार सामील झाले होते. या कलाकारांनी करण आणि द्रिशाच्या रिसेप्शन पार्टीत धमाकेदार डान्स केला. सनी देओलसोबत सलमान खान आणि आमिर खानने खूप धमाल केली. मात्र अभिनेता शाहरुख खानकरण देओलच्या रिसेप्शन पार्टीत कुठेच दिसला नाही.  


खरं तर, सनी देओल यांच्या मुलाच्या रिसेप्शन पार्टीत शाहरुख खानने हजेरी लावली नव्हती, त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्य वाटले की, जेव्हा सलमान खान आणि आमिर खानने करणच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती, तर शाहरुख खानला का बोलावले नाही? सनी देओल यांनी शाहरुख खानला त्याच्या मुलाच्या रिसेप्शन पार्टीत आमंत्रित केले नाही हे जाणून घेऊया.

सनी देओल आणि शाहरुख खानचं यांचं एकमेकांशी असलेले संबंध फारसे चांगले नाही आणि याचे कारण म्हणजे 1993 मध्ये रिलीज झालेला 'डर' चित्रपट. या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुख एकत्र दिसले होते. या चित्रपटात सनी देओल हे कमांडोच्या भूमिकेत होते, तर शाहरुख नकारात्मक भूमिकेत होता. पण 'डर' चित्रपटात सनी यांच्यापेक्षा शाहरुख खानच्या व्यक्तिरेखा जास्त गाजली, हे सनी देओल यांना अजिबात आवडले नाही. सनी देओल यांनी चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलायचा होता कारण निर्माते चित्रपटातील खलनायकाची व्यक्तिरेखा हिरो म्हणून दाखवत होते, पण निर्मात्यांनी त्यांचं ऐकलं नाही. 'डर' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले होते. रिपोर्ट्स नुसार या चित्रपटानंतर शाहरुख खान आणि सनी देओल जवळपास 16 वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Why shah rukh khan was not invited in karan deol wedding reception is sunny deol reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.