कशाला हवाय ‘गॉडफादर’?

By Admin | Published: May 22, 2017 02:11 AM2017-05-22T02:11:50+5:302017-05-22T02:11:50+5:30

‘गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणं कठीण’, असं एक गृहीतक ‘बी टाऊन’ इंडस्ट्रीत मानलं जातं. मोठ्या स्टारकास्टसोबत आपल्याला ब्रेक मिळत नाही, असा उगाचच एक समज आहे.

Why the Godfather? | कशाला हवाय ‘गॉडफादर’?

कशाला हवाय ‘गॉडफादर’?

googlenewsNext

‘गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणं कठीण’, असं एक गृहीतक ‘बी टाऊन’ इंडस्ट्रीत मानलं जातं. मोठ्या स्टारकास्टसोबत आपल्याला ब्रेक मिळत नाही, असा उगाचच एक समज आहे. मात्र, तुम्हाला हे माहितीय का की, कुणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये करिअर करणारे स्टार्सही आज इंडस्ट्रीत आहेत. या स्टार्सनी त्यांच्या स्वत:च्या हिंमतीवर हे ग्लॅमर आणि मानसन्मान मिळविला आहे. कोण आहेत हे कलाकार पाहूयात तर मग....


शाहरुख खान
दिल्लीत जन्मलेल्या शाहरुख खानला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. ८०च्या दशकात जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा सुरुवातीला थिएटर करत होता. त्याने ‘दिवाना’ चित्रपटातून त्याच्या करिअरचा डेब्यू केला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात त्याचे नशीबच पालटले. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’नंतर त्याच्या करिअरने जी सुसाट वाट धरली ती आजपर्यंत त्याच वेगात आहे. आज त्याचे नाव ‘ए’ लिस्टच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिचेदेखील नाव लिस्टमध्ये आहे. ती केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही तिच्या यशाचा झेंडा रोवत आहे. तिने एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. २०००मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला. यानंतर तिने ‘दि हिरो-लव्हस्टोरी आॅफ अ स्पाय’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. आज ती एक मोठी स्टार बनली आहे. तिच्या फॅन्सची संख्या आज लाखों-करोडोंच्या संख्येत आहे.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण हिचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता. ती बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर एक खूप प्रसिद्ध मॉडेल होती. तिने २००७मध्ये बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून डेब्यू केला. २००८मध्ये ‘किंगफिशर फॅशन अ‍ॅवॉर्ड’मध्ये तिने ‘मॉडेल आॅफ दि इयर’ हा किताब मिळविला होता. आज ती ‘ए’ लिस्टर्स कलाकारांपैकी एक आहे.

ऐश्वर्या रॉय
बॉलिवूडच्या सर्वांत मोठ्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाणारी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या रॉयला पाहिले जाते. तिनेही तिचे करिअर मॉडेलिंगपासूनच सुरू केले होते. ९०च्या दशकांत ती कॉलेजच्या बाहेर नाव कमावण्यासाठी मेहनत करू लागली. त्यानंतर तीन वर्षांत ती तमीळ चित्रपट ‘इरूवर’ मध्ये अभिनय करून इंडस्ट्रीत आली. त्याच वर्षी तिने ‘और प्यार हो गया’ मधून डेब्यू करून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत होती.

कॅटरिना कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने तिचे करिअर मॉडेलिंगपासूनच सुरू केले होते. तिने जवळपास १४ वर्षाच्या काळात करिअर बनवायला सुरुवात केली. यादरम्यान, लंडनच्या एका कैजाद गुस्ताद यांनी एका अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी एक रोल कॅटला आॅफर केला होता. त्यानंतर तिने २००३ मध्ये ‘बूम’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर कॅटरिना कैफने खूप मेहनत केली; मात्र मागे वळून तिने पाहिले नाही.




 

Web Title: Why the Godfather?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.