खबर पक्की है...!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:36 PM2024-04-23T15:36:28+5:302024-04-23T15:36:48+5:30

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर नुकतीच लुटेरे या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली.

Why Amruta Khanvilkar Says Khabar Pakki Hai...!, Know About This | खबर पक्की है...!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

खबर पक्की है...!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

'लुटेरे' वेबसीरिजमधून २०२४ वर्षांची सुरूवात करणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आता आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ती अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील चाचा विधायक है हमारे ३ मध्ये झळकणार आहे. लुटेरेमधली अविका ते आता चाचा विधायक है हमारे ३ मधली सुरेखा जी असा अमृताचा बॉलिवूड प्रवास अखंड सुरूच आहे. 

अमृता खानविलकर हिने सोशल मीडियावर तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. ती चाचा विधायक है हमारे ३ या वेबसीरिजमध्ये कॉमेडियन झाकीर खान सोबत दिसणार आहे. अमृताने एक खास पोस्ट लिहिली आणि त्याला कॅप्शन देखील तितकच खास दिले आहे. मार्केटमध्ये विधायक जी यांना टक्कर देण्यासाठी कोणी तरी येतंय खबर पक्की आहे ! असं म्हणत अमृताने या शो वर शिक्कमोर्तब केले आहे. 

पोस्टमध्ये अमृता म्हणते की, लुटेरेनंतर अजून एक बॉलिवूड प्रोजेक्ट करताना खूप आनंद होतोय. अमेझॉनसारख्या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आमची वेबसीरिज येतेय याहून मोठी गोष्ट काय असणार! विधायक जी यांना टक्कर देणारी सुरेखा नक्की काय भूमिका बजावणार ? याची मला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच प्रेक्षकांना सुद्धा याची उत्सुकता आहे. कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहण्यासाठी अजून काम करण्याची प्रेरणा यातून मिळते. चाचा विधायक है हमारे सीजन ३ मध्ये झाकीर खान सारखा दर्जेदार कॉमेडियन सोबत काम करण्याचा योगायोग या निमित्ताने जुळून आला आणि आता हा शो लवकरच सगळ्यांचा भेटीला येतोय म्हणून मी खूप उत्सुक आहे

वर्कफ्रंट...
चाचा विधायक है हमारे ३ व्यतिरिक्त अमृताकडे कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव या चित्रपटांचा समावेश आहे.

Web Title: Why Amruta Khanvilkar Says Khabar Pakki Hai...!, Know About This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.