सिद्धार्थ मल्होत्राने कोणासोबत घेतले एकत्र शॉवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 16:47 IST2017-01-02T16:45:42+5:302017-01-02T16:47:12+5:30
‘कॉफी विथ करण’ एक असा शो आहे जो आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना त्यांचे गुपित उघडे पाडण्यास भाग पाडतो. आतापर्यंत अक्षय-ट्ंिवकल, ...

सिद्धार्थ मल्होत्राने कोणासोबत घेतले एकत्र शॉवर?
‘ ॉफी विथ करण’ एक असा शो आहे जो आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना त्यांचे गुपित उघडे पाडण्यास भाग पाडतो. आतापर्यंत अक्षय-ट्ंिवकल, अर्जुन-वरुण, रणबीर-रणवीर, अनुष्का-कॅटरिना, परिणीती-आदित्य रॉय अशा ‘आॅड’ जोड्या आपल्या शोवर बोलवून करणने पाचवा सीझन एकदम मसालेदार आणि गॉसिपमय केलेला आहे.
गेल्या रविवारी मीरा राजपूतने पती शाहिद कपूरची पोलखोल केल्यानंतर पुढच्या भागात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस एकमेकांचे सिक्रेटस् बाहेर काढताना दिसणार आहेत. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमधून तरी दोघांच्या खासगी जीवनातील अनेक रसभरीत किस्से या शोमध्ये पाहायला मिळणार असे दिसतेय.
हॉट आणि ग्लॅमरस जॅकलिनला जेव्हा करणने विचारले की, तु सिद्धार्थच्या घरातून बाहेर पडताना दिसली होती. यावेळी दोघे काय करत होते. तिच्या बचावासाठी सिद्धार्थ म्हणतो की, ‘आम्ही पटकथेचे वाचन करत होतो.’ मात्र यावेळी जॅकलिनला हसू थांबवता येत नाही. यावरूनच कळते की, ते वाचन तर करीत नव्हते. कहाणी कुछ और ही है!
करणच्या रॅपिड फायर प्रश्नांनासुद्धा दोघांनी बिनदिक्कत उत्तरे दिली. यावेळी त्यांनी कुठलीच तमा बाळगलेली नव्हती दिसत. खासकरून सिद्धार्थ तर एक दम फॉर्ममध्ये दिसतो. न लाजता त्याने मान्य केले की, त्याने एका मुलीसोबत एकत्र आंघोळ केलेली आहे तसेच फोन सेक्सचासुद्धा त्याला अनुभव आहे. आती ‘शॉवर गर्ल’ कोण होती हे कळण्यास काही मार्ग नाही.
जॅकलिनसुद्धा काही मागे नाही. आता तिने जरी एकत्र शॉवर किंवा फोन सेक्स असे काही केलेले नसले तरी तिने सांगितले की, एका कलाकाराशी फ्लर्टिंग करताना तिने फ्रेंचमधून त्याला लग्नाची मागणी घातली होती. त्या बिचाऱ्याला काही कळालेच नाही की ती काय म्हणाली.
अशाच मसालेदार गॉसिपने हा एपिसोड भरलेला असेल यात काही शंका नाही. तसे पाहिले तर शॉकिंग खुलासे करणे या शोवर काही नवी गोष्ट नाही. यापूर्वी ट्विंकलने सांगितले होते की, लग्नापूर्वी तिची आई डिंपल कपाडियाला अक्षय समलैंगिक वाटायचा. मागच्या सीझनमध्ये सलमानने अद्यापही ब्रह्मचारी असल्याचे मान्य केले होते.
सिद्धार्थ आणि जॅकलिन आगामी ‘रिलोडेड’ नावाच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची घनिष्ट मैत्री झाली. सिद्धार्थ आलियासोबत न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी अॅम्स्टरडला गेला होता. त्यापूर्वी ते बँकॉकला सुट्या घालविण्यासाठी गेले होते.

From ‘Koffee Shots’ to steamy conversations, @S1dharthM & @Asli_Jacqueline will be turning on the heat next Sunday on #KoffeeWithKaran! pic.twitter.com/lLQ2SkhDwZ— Star World (@StarWorldIndia) January 1, 2017