साऊथ सिने इंडस्ट्रीतील कोणत्या स्टारकडे किती संपत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 13:40 IST2018-04-06T13:38:34+5:302018-04-06T13:40:43+5:30
श्रीमंतीच्या बाबतीतही साऊथचे अनेक स्टार्स बॉलिवूड स्टार्सच्या बरोबरीतच आहे असे दिसते.

साऊथ सिने इंडस्ट्रीतील कोणत्या स्टारकडे किती संपत्ती?
साऊथमधील सिनेमांची क्रेझ आता केवळ साऊथ इंडियापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. या सिनेमांना सर्वच भागातील प्रेक्षकांकडूनही पसंती मिळत आहे. अनेक साऊथ सिनेमांचे हिंदी रिमेक केले गेले आहेत. ज्यांनी चांगली लोकप्रियता मिळवली आणि कमाईही केली. अशात त्यांचं स्टारडम बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जराही कमी नाही. श्रीमंतीच्या बाबतीतही साऊथचे अनेक स्टार्स बॉलिवूड स्टार्सच्या बरोबरीतच आहे असे दिसते.
रजनीकांत:
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याची लोकप्रिय मोठी आहे. त्यांना प्रेक्षक एखाद्या देवाप्रमाणे मानतात. त्यांचे सिनेमेही बॉक्स ऑफिसवर धमाल करतात. रजनीकांत यांचे सिनेमांसोबतच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट, शेअर्स, प्रॉडक्शन आणि स्टुडीओजमध्ये पैसे लागले आहेत. एका वेबसाईटनुसार त्यांच्याकडे ३60 कोटींची संपत्ती आहे.
कमल हसन:
कमल हसन हे जितके साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत तितकेच ते बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक हिंदी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. त्यांच्या सिनेमांसोबतच त्यांचे अफेअर्सही चांगलेच चर्चेत असतात. नुकतेच ते लिव्ह इन रिलेशनशिपमधून बाहेर पडले आहेत. कमल हसन यांच्याकडे 140 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.
नागार्जून:
नागार्जून हा अभिनयासोबतच सिने निर्माताही आहे. त्याने अनेक हिंदी सिनेमांमध्येही कामे केली आहेत. यासोबत त्याचे टिव्हीमध्येही अनेक शेअर्स आहेत, अन्नपूर्णा स्टुडिओज, एन-कन्वेंशन सेंटर, मुंबई मास्टर्स ऑफ इंडियन बॅदमिंटन लीगचा तो सहमालक आहे. यासोबत तो 800 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
प्रभास:
प्रभासला बाहुबलीनंतर मोठी लोकप्रियता मिळाली. त्याचा बाहुबली २ सुद्धा दणक्यात चालला. यासोबत त्याने अॅक्शन जॅक्सन सिनेमातही एक छोटी भूमिका केली होती. या अभिनेत्याकडे 160 कोटींची संपत्ती आहे.
महेश बाबू:
साऊथमधील आणखी एक सुपरस्टार महेश बाबू याचाही मोठा चाहतावर्ग आहे. हा अभिनेता अभिनयासोबतच इतरही बिझनेस करतो. पद्मालया स्टुडिओज, तेलगु सिनेमांची तो निर्मितीही करतो. त्याच्याकडे तब्बल 11३ कोटींची संपत्ती आहे.
रामचरण तेजा:
चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा यानेही साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याच्याकडे एअर लाईन कंपनी, पोलो रायडिंग क्लब, ऑबस्टॅकल रनिंग सीरीज, डेविल्स सर्किट, कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी, मां टीव्हीमध्ये शेअर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती 1250 कोटी इतकी आहे.