कोण आहे सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड? आता कोणावर जडलंय सैफच्या लेकीचं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:00 IST2025-07-30T12:59:56+5:302025-07-30T13:00:38+5:30

Sara Ali Khan :बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान प्रोफेशनल लाइफशिवाय तिच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत येत असते.

Who is Sara Ali Khan's rumored boyfriend? Who is Saif Ali Khan's daughter in love with now? | कोण आहे सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड? आता कोणावर जडलंय सैफच्या लेकीचं प्रेम

कोण आहे सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड? आता कोणावर जडलंय सैफच्या लेकीचं प्रेम

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) प्रोफेशनल लाइफशिवाय तिच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत येत असते. सध्या तिच्या कथित बॉयफ्रेंडबद्दल बरीच चर्चा आहे. अलीकडेच ती एका हॅण्डसम मुलासोबत दिसली होती. पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सारा अली खानचे नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे जिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. कार्तिक आर्यन, वीर पहाडियाशी डेट केल्यामुळे ती चर्चेत आली. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. यानंतर, पुन्हा एकदा साराचे नाव एका हॅण्डसम हंकशी जोडले गेले.

सध्या 'मेट्रो इन दिनो' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेली सारा अली खान दिल्लीतील एका गुरुद्वारात दिसली. यावेळी ती तिचा कथित बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवासोबत दिसली. दोघांच्या गुरुद्वारात एकत्र जाण्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की ते एकमेकांना डेट करत आहेत.


कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?
अर्जुनचे नाव सारा अली खानशी जोडले जात आहे. तो व्यवसायाने अभिनेता, संगीतकार आहे. तसेच, त्याला मार्शल आर्ट्सची आवड आहे. इतकेच नाही तर त्याचा राजकीय पार्श्वभूमी आहे. तो पंजाब भाजपचे उपाध्यक्ष फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे. मात्र, तो बॉलिवूडमध्ये फारसा प्रसिद्ध नाही. अर्जुन फिटनेस फ्रिक आहे. याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. त्याचे इंस्टाग्रामवर ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एवढेच नाही तर त्याला मलायका अरोरा, भूमी पेडणेकर आणि रिद्धिमा पंडित सारखे प्रसिद्ध कलाकारदेखील फॉलो करतात. डेटिंगच्या चर्चेवर दोघांकडूनही कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Who is Sara Ali Khan's rumored boyfriend? Who is Saif Ali Khan's daughter in love with now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.