"मी सध्या प्रेमाच्या...", खऱ्या आयुष्यात कोण आहे 'पंचायत ४'च्या रिंकीचा सचिव जी?, स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:44 IST2025-07-09T16:44:02+5:302025-07-09T16:44:19+5:30
Panchayat 4 Fame Sanvikaa 'पंचायत'ची रिंकी म्हणजेच सान्विकाने नुकतेच एका मुलाखतीत ती खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करत आहे, याबद्दल सांगितले.

"मी सध्या प्रेमाच्या...", खऱ्या आयुष्यात कोण आहे 'पंचायत ४'च्या रिंकीचा सचिव जी?, स्वतःच केला खुलासा
लोकप्रिय वेबसीरिज 'पंचायत'(Panchayat 4)चा चौथा सीझन नुकताच भेटीला आला आहे. या सीरिजमध्ये प्रधान, विनोद आणि सचिवजी यांच्यानंतर लोकांना सर्वात जास्त आवडणारी व्यक्तिरेखा म्हणजे रिंकी. या मालिकेत रिंकीची भूमिका साकारली आहे सान्विकाने (Sanvikaa). पहिल्या सीझनपासून चौथ्या सीझनपर्यंत रिंकीचं पात्र ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं ते लोकांना आवडलं. विशेषतः रिंकी आणि सचिवजींची प्रेम कहाणी. 'पंचायत'ची रिंकी म्हणजेच सान्विकाने नुकतेच एका मुलाखतीत ती खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करत आहे, याबद्दल सांगितले.
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सान्विकाला विचारण्यात आले की, सीरिजमध्ये रिंकीला तिचे प्रेम सापडले आहे. खऱ्या आयुष्यात सान्विकासोबत असे काही घडले आहे का? त्यावर ती म्हणाली की, ''नाही, नाही मी सध्या प्रेम शोधत नाहीये. सध्या मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. माझी कारकिर्द नुकतीच सुरू झाली आहे आणि मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. म्हणून सध्या माझे लक्ष फक्त माझ्या करिअरवर आहे. प्रेम जेव्हा घडेल तेव्हा होईल. सध्या ते फक्त करिअर आहे.''
पंचायतीची रिंकी खूप शांत आहे. मग सान्विका खऱ्या आयुष्यात कशी आहे, असे विचारल्यावर ती म्हणाली की, ''मी आधी खूप शांत असायचे. पण, आता हळूहळू मी बदलत आहे. खूप बोलावे लागते आणि नेटवर्किंग करावे लागते. आता मला ते आवडते. पूर्वीच्या काळातील सान्विका कदाचित स्वतःची ओळखही करून देऊ शकत नव्हती. आता माझा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. मी पूर्वीपेक्षा जास्त बोलू लागली आहे. या प्रवासाचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे. हे खूप मनोरंजक आहे. नवीन आव्हाने आहेत.''