केतकीने वाढविले वजन

By Admin | Updated: August 7, 2015 23:19 IST2015-08-07T23:19:29+5:302015-08-07T23:19:29+5:30

मराठीमध्येही आता भूमिकेच्या गरजेपोटी स्वत:मध्ये बदल घडवून आणणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता केतकी माटेगावकरचीही भर पडली आहे

Whiskey weight | केतकीने वाढविले वजन

केतकीने वाढविले वजन

मराठीमध्येही आता भूमिकेच्या गरजेपोटी स्वत:मध्ये बदल घडवून आणणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता केतकी माटेगावकरचीही भर पडली आहे. तिने भूमिकेच्या गरजेपोटी तब्बल सहा किलो वजन वाढवले आहे.दिग्दर्शक सुजय डहाके ‘फुंतरू’ हा सायन्स फिक्शन अर्थात विज्ञानकथा घेऊन येतोय. केतकी पहिल्यांदाच एका हटके, मॉडर्न लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्या लूकवर सुजय डहाके, आयुषी जगद यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. दिवसात ६० डे्रसेसचे ट्रायल्स व एका परफेक्ट लूककरिता १६ तास देण्यात आले. याबाबत केतकी म्हणाली, या चित्रपटात मी मेकॅनिकल इंजिनिअरची भूमिका साकारत आहे. मी हा चित्रपट निवडला, कारण माझ्या आधीच्या प्रतिमा माझ्या खऱ्या प्रतिमेच्या जवळ जाणाऱ्या असल्या तरीही ती प्रतिमा बदलणारा रोल हवा होता. ही भूमिका फार स्ट्राँग आहे. सुजयनी स्टोरी अप्रतिम लिहिली आहे. हॉलिवूडमध्ये ज्या प्रकारचा काम केलं जातं तसंच इथे केलं आहे. यासाठी मला फार संयम ठेवायला लागला. भूमिकेच्यादृष्टीने खूप अभ्यास करायला लागला. कदाचित याच मेहनतीमुळे फूंतरूची आतुरतेने वाट बघते आहे.

Web Title: Whiskey weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.