जेव्हा अप्सरा मेट बादशाह शाहरुख खान
By Admin | Updated: July 17, 2017 00:55 IST2017-07-17T00:55:23+5:302017-07-17T00:55:23+5:30
आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. असाच आनंद या फोटोत सोनाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.

जेव्हा अप्सरा मेट बादशाह शाहरुख खान
आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. असाच आनंद या फोटोत सोनाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. शाहरूखसोबत सोनालीचा हा फोटो पाहून शाहरूखसह ती कोणत्या सिनेमात झळकणार की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. मात्र, असे काही नसून सोनालीने काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या आॅफिसला भेट दिली. आणि याच बिल्डिंगमध्ये अचानक शाहरुख आणि सोनालीची भेट झाली. किंग खान शाहरुख समोर म्हटल्यावर एक फोटो होणार नाही हे तर अशक्यच. तसेच सोनाली शाहरूखची फॅन आहे. शाहरूखच आपले क्रश असल्याचेही तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये म्हटलंय. शाहरूखसह क्लिक केलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिला खूप साऱ्या प्रतिक्रिया मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनालीने या फोटोला शाहरुख भेटीमुळे सोनाली भलतीच खुश आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर शाहरुखसोबतचा फोटो पोस्ट करुन ‘काही छायाचित्रांना कॅप्शनची गरज नसते... बस नाम की काफी है...’, असे लिहिले आहे. सोबतच ‘माय क्रश’, ‘जबरा फॅन’, ‘व्हेन सोनाली मेट एसआरके’, ‘फॅन मोमेंट’ हे हॅशटॅग सुद्धा तिने दिले आहेत.