चित्रपट निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचं निधन, बॉलिवूडवर पसरलली शोककळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:22 PM2022-08-22T17:22:06+5:302022-08-22T17:33:20+5:30

AG Nadiadwala passed away: ‘वेलकम’ आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. चित्रपटसृष्टीत ते गफ्फारभाई म्हणून लोकप्रिय होते.

Welcome and hera pheri movie producer A. G. Nadiadwala's passed away | चित्रपट निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचं निधन, बॉलिवूडवर पसरलली शोककळा!

चित्रपट निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचं निधन, बॉलिवूडवर पसरलली शोककळा!

googlenewsNext

AG Nadiadwala passed away: ज्येष्ठ बॉलिवूड चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला (AG Nadiadwala)  यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळं उपचासांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा मुश्ताक नाडियादवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

चित्रपटसृष्टीत ते गफ्फारभाई म्हणून लोकप्रिय होते. त्यांना  फिरोज, हाफिज आणि मुश्ताक अशी तीन मुलं आहेत. 
 प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला त्यांचा पुतणा आहे. गफ्फारभाई हे मुंबई आणि गुजरातमधील स्टुडिओ असलेल्या नाडियादवाला चित्रपट बॅनरच्या संस्थापकांपैकी एक होते. 

अजय देवगणनं वाहिली श्रद्धांजली
अभिनेता अजय देवगण यानं  ए. जी. नाडियादवाला श्रद्धांजली वाहिली आहे. माझे वडिल आणि ए. जी. नाडियादवाला यांनी बॉलिवूडच्या सुवर्णकाळात एकत्र काम केलं होतं, असं म्हणत अजयनं नाडियादवाला यांना श्रद्धांजली वाहिली. 

 १९८४मध्ये त्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.  ९०च्या दशकात त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता.आपल्या पाच दशकांहून अधिक काळातील चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी 'आ गले लग जा', 'लहू के दो रंग', 'शंकर शंभू', 'झूठा सच', 'सोने पर सुहागा', 'वतन के' यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली आहे. अक्षय कुमारचा २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेलकम’ आणि  ‘हेरा फेरी’ या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली होती.

Web Title: Welcome and hera pheri movie producer A. G. Nadiadwala's passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.